ETV Bharat / city

BJP leaders relation with Actress : भाजप नेत्यांचा कोणकोणत्या अभिनेत्रीशी संबंध, उघड करायला लावू नका - नवाब मलिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक

सध्या महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दिशा सालियन हीचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच भाजप आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करून याबाबत लवकरच सत्य समोर येईल, असे सांगितले आहे.

नवाब मलिक
नवाब मलिक
author img

By

Published : Feb 22, 2022, 8:45 PM IST

मुंबई - भाजप नेत्यांचा कोणकोणत्या अभिनेत्री सोबत संबंध ( BJP leaders relation with Actress ) आहेत. हे आम्हाला उघड करायला लावू नका. नाव उघड केल्यास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आपली तोंड दाखवायलादेखील जागा उरणार नाही, असा इशारा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक ( Nawab Malik on BJP leaders relations ) यांनी दिला आहे.

सध्या महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आरोप-प्रत्यारोप ( Disha Salian death controversy ) सुरू आहेत. दिशा सालियन हीचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच भाजप आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करून याबाबत लवकरच सत्य समोर येईल, असे सांगितले आहे. राणेंकडून होणार्‍या या आरोपानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी इशारा ( Nawab Malik on Disha Salian Death ) दिला आहे.

हेही वाचा-Patra Chawl redevelopment : मुंबई सोडून जाऊ नका! पत्रा चाळवासियांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

महापौर किशोरी पेडणेकर यांची महिला आयोगाकडे तक्रार-

सातत्याने होणाऱ्या आरोपांनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाकडे यासंबंधीची तक्रार केली. तसेच आज महिला आयोगाच्या सदस्य आणि स्वतः महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर दिशा सालियन यांच्या कुटुंबियांनीदेखील याबाबत रीतसर तक्रार महिला आयोगाच्या सदस्यांनीकडे दिली आहे.

हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत मंगळवारी १३५ नवे रुग्ण, २ जणांचा मृत्यू

तुम्ही जगा, आणि आम्हालाही जगू द्या!
सातत्याने दिशा सालियनच्या नावाचा वापर राजकीय हेतूसाठी केला जात आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाची बदनामी थांबवा. तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या अशी कळकळीची विनंती दिशा सालियन यांच्या आई-वडिलांकडून आज करण्यात आली आहे.

हेही वाचा-Koyna Express : कोयना एक्स्प्रेसचा डब्यात वाढ; रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.