ETV Bharat / city

National Mathematics Day : 'बे एक बे', असा दोन हजार विद्यार्थ्यांचा आवाज चिटणीस पार्क येथे घुमला - आझादी का अमृतमहोत्सव

राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त ( National Mathematics Day ) भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामनूजन ( Srinivasa Ramanujan ) यांच्या जयंतीदिनी दोन हजार विद्यार्थ्यांचा एकत्र पाढे पठण करण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यात महालाच्या चिटणीस पार्कवर विद्यार्थाना विशिष्ट पद्धतीने बैठक व्यवस्था 75 अंकासारखी करून स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्ष अमृत महोत्सव आणि राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये पाढे पठणाची गणिताची आवड निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. महापालिका व अग्रेसर फाउंडेशनच्या वतीने हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Dec 22, 2021, 4:55 PM IST

नागपूर - राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त ( National Mathematics Day ) भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामनूजन ( Srinivasa Ramanujan ) यांच्या जयंतीदिनी दोन हजार विद्यार्थ्यांचा एकत्र पाढे पठण करण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यात महालाच्या चिटणीस पार्कवर विद्यार्थाना विशिष्ट पद्धतीने बैठक व्यवस्था 75 अंकासारखी करून स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्ष अमृत महोत्सव आणि राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये पाढे पठणाची गणिताची आवड निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. महापालिका व अग्रेसर फाउंडेशनच्या वतीने हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

आढावा घेताना प्रतिनिधी

सुमारे 75 शाळेच्या 8 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला...

'आझादी का अमृतमहोत्सव' व राष्ट्रीय गणित दिवस या निमित्त मागील पंधरा दिवसांपासून अग्रेसर फाउंडेशनच्या वतीने 75 शाळांमध्ये पाढे पठणाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे 8 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचे कार्यक्रम आज गणित दिनानिमित्त चिटणीस पार्क येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना बसवून '75', अशी संख्या तयार करण्यात आली होती. तसेच त्या सर्व विद्यार्थ्यांनी पाढे पठण केले. स्पर्धेतील यावेळी नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

गणिताची गोडी निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम

विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी या उपक्रमाच्या माध्यमातून लागावी यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तसेच अग्रेसर फाउंडेशनच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्या माध्यमातून कधी भिंतींवर गणितीय सूत्र रंगवणे, गणिताची गोडी निर्माण करण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांकडून पाढे पठन करून घेणे तसेच विविध उपक्रम अग्रेसर फाउंडेशनच्या वतीने वर्षभर राबवले जात असतात, अशी माहिती यावेळी शिवानी दाणी यांनी दिली.

हे ही वाचा - Raosaheb Danve Visit RSS Headquarters : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची संघ मुख्यालयाला भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.