ETV Bharat / city

Nana Patole On Hanuman Chalisa : 'देशासमोर अनेक प्रश्न असताना राणांच्या हनुमान चालीसा पठणात काँग्रेसला रस नाही'

author img

By

Published : May 28, 2022, 1:30 PM IST

नवनीत राणा ( Navneet Rana ) यांना हनुमान चालीसा पठन ( Hanuman Chalisa Reading ) करावसे वाटत असेल तर आणि फक्त हाच प्रश्न महत्वाचा आहे, असे वाटत असेल तर यात कॉंग्रेसला काहीही रस नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole On Hanuman Chalisa ) म्हणालेत. ते नागपूर विमातळावर माध्यमांशी बोलतील.

Nana Patole On Hanuman Chalisa
Nana Patole On Hanuman Chalisa

नागपूर - खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालीसा पठन ( Hanuman Chalisa Reading ) करावसे वाटत असेल तर आणि फक्त हाच प्रश्न महत्वाचा आहे, असे वाटत असेल तर यात कॉंग्रेसला काहीही रस नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole On Hanuman Chalisa ) म्हणालेत. ते नागपूर विमातळावर माध्यमांशी बोलतील.

काय म्हणाले नाना पटोले - या प्रश्नांमध्ये काँग्रेसला कुठलाही रस नाही. मी हिंदू धर्माचा आहे. मी वारंवार सांगतो हनुमान चालीसा घरी वाचतो. आमचा धर्म आमच्या आस्थेचा विषय आहे. पण मूळ प्रश्न देशासमोर असताना केंद्र सरकारने आठ वर्षात देश विकून देश चालवण्याचे काम केले आहे. देशाचे संविधान बद्दलवण्याचे काम चालू आहे. बेरोजगारी महागाईच्या कचाट्यातून जनता बाहेर पडत नसताना हे सगळे प्रश्न असताना या प्रश्नाला कॉंग्रेसला मात्र त्यात रस नाही, असे म्हणत राणा दामपत्याच्या हनुमान चालीसा पठनावर ते बोलत होते. मला राणा दाम्पत्याबद्दल कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. तो आमचा विषय नाही. आम्ही धर्मचा आदर करतो, त्याची जाहिरात करत नाही, असेही पटोले म्हणाले. सर्व विभागातील बदल्यांना स्थगिती दिलेली आहे. यावर बोलताना म्हणाले नाना पटोले म्हणाले की, शासन कर्मचारी संघटना ह्या दोघांमध्ये निर्णय झालेला आहे. म्हणून शासनाने बदल्यांचा निर्णय घेतला आहे. प्रियंका गांधी जर महाराष्ट्रातील राज्यसभा लढत असेल तर सगळेच त्यांचे स्वागत करतील. यात हायकमांड काय निर्णय घेते याकडे लक्ष लागेल आहे.

सोशल मीडियाचे शिबिर - सोशल मीडियाचे शिबिर सुरू आहे. यात रोज चाळीस कोटी रुपये देशात भाडोत्री सोशल मीडिया लोकांवर भाजप खर्च करत आहे. हे लोक वापरू काम करत आहे. ते काम काँग्रेस करणार नाही. आम्ही सत्य परिस्थिती समाजासमोर मांडणार आहे. आज काँग्रेसचे कार्यकर्ते सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात. त्यांना अजून ट्रेनिंग देणे भाजपच्या लोकांच्या विरोधात तयार करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते यांना सोशल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून सगळ्यांना प्रशिक्षित करून देश वाचवण्याची ही काँग्रेसची जबाबदारी आहे. समाजासमोर समाजासमोर सत्य परिस्थितीची मांडणी काँग्रेस सोशल मीडियाच्या माध्यमातून करणार आहे.

हेही वाचा - Rana couple Nagpur : राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि राणा दाम्पत्याला अटीशर्थींसह हनुमान चालिसा पठणाची परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.