नागपूर - ममता बॅनर्जींचा संकल्प देश विकणार्यांचा साथ देणारा होता, तर सामनातून मांडलेली भूमिका देशहिताची आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सदर मत व्यक्त केले.
हेही वाचा - Nagpur Fight against Omicron : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर
सामनातून मांडलेली भूमिका सत्ता टिकवण्यासाठी नाही
राजकीय पक्षांनी कुणाबरोबर राहायचे आता ते त्यांना ठरवावे लागणार आहे. भाजप सरकार केंद्रात आल्यानंतर त्यांनी देशाचे वाटोळे करण्याचे काम सुरू केले. चीन अरुणाचलमध्ये अतिक्रमण करून बसला आहे. दुसरीकडे रोज देशाची संपत्ती विकाल्या जात आहे. संविधान पायदळी तुडवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे, ममता बॅनर्जी यांनी जी भूमिका मांडली होती ती एक प्रकारे देश विकणार्यांची साथ देणारी आहे. सामनाच्या अग्रलेखातून जे मांडले गेले ते देशहित लक्षात घेऊन मांडण्यात आलेले आहे. सत्ता टिकवण्यासाठी ती भूमिका मांडलेली नाही, असे नाना पटोले म्हणालेत. काँग्रेसला सोबत घेतल्या शिवाय किंवा काँग्रेसला दूर करणे चुकीचे, यावर पटोले यांनी सामानाचे कौतूक केले आणि ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या टीकेला एकप्रकारे समर्थन दिले.
विधानसभेचे अध्यक्ष पद हे विदर्भाकडे येईल का?
कोण अध्यक्ष होणार हे काँग्रेसचे हायकमांड ठरवणार आहेत. हिवाळी अधिवेशनात काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होईल, आणि त्याचे नाव वेळेवर जाहीर होईल, असे म्हणत नाना पटोले यांनी अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे जाणार, हे गुलदस्त्यात ठेवले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळावा
एसटी महामंडळाचे आंदोलन सुरू आहे, त्यात सेवा नियमानुसार कारवाई व्हावी. हे आंदोलन भाजपने उचकवल्यामुळे करण्यात आले. प्रवाशांचे हाल झाले आहे, पण असे असले तरी, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मदत होईल आणि न्याय मिळावा, ही काँग्रेसची भूमिका आहे.
भाजपडून घोडे बाजार सुरू
विधान परिषदेसाठीचा काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार थंडावला आहे, यावर बोलताना पटोले म्हणाले की, प्रत्येकाची रणनीती असते. काही लोक घोडेबाजार करून तर, काही लोक हे विचाराने निवडणूक लढत असतात. विचारांची लढाई आहे. भाजप देशभरात घोडेबाजार आणि ब्लॅकमेलिंग करत आहे. हे सगळ्यांना माहीत आहे. भाजपचा उमेदवार कसा घोडेबाजार करत आहे, हे माहीत आहे. त्यामुळे, काँग्रेसचा विचाराने विजय होईल, हा आमचा विश्वास आहे.
हेही वाचा - Omicron Variant : नागपूर मनपाचा ओमायक्रॉन रोखण्यासाठी 'हा' फार्म्युला