ETV Bharat / city

Nagpur : कोरोनापाठोपाठ नागपुरात स्वाईन फ्लूचं संकट; गेल्या 24 तासात स्वाईन फ्लूचे 6, तर कोरोनाचे 291 रुग्ण

author img

By

Published : Jul 28, 2022, 9:22 AM IST

Updated : Jul 28, 2022, 10:17 AM IST

Nagpur : शहरात कोरोनाचे 200 रुग्णाची भर पडत ( Nagpur Corona Update ) असताना आज शहरात 4 स्वाईनफ्लूचे ( Nagpur swine flu Update ) रुग्ण मिळून आले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू ( Swine flu crisis in Nagpur ) झाला आहे. कोविड ( Covid ) रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच नागपूर शहरात इन्फल्युएंझा A (H1N1) किंवा स्वाईन फ्लूचे या वर्षात एकूण 20 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 16 रुग्ण नागपूर महानगरपालिका हद्धीतील असून 4 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

Nagpur
Nagpur

नागपूर - शहरात मागील काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढतीवर आहे. दररोज सरासरी 200 रुग्णाची भर पडत असताना आज शहरात 6 स्वाईनफ्लूचे रुग्ण मिळून आल्याने धडकी भरली आहे. यासोबतच कोरोनाचे 291 रुग्ण मिळाले असताना दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. (Nagpur Corona Update ) त्यामुळे नागपुरकरांच्या चिंतेत वाढ होत आहे. स्वाईन फ्ल्यूचचे यापूर्वी 14 रुग्ण मिळून आले असताना ही संख्या आज वाढून 22 वर जाऊन पोहचली आहे.

18 रुग्ण पॉझिटिव्ह - कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच नागपूर शहरात इन्फल्युएंझा A (H1N1) किंवा स्वाईन फ्लूचे या वर्षात एकूण 22 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 16 रुग्ण नागपूर महानगरपालिका हद्धीतील असून 6 रुग्ण शहराबाहेरील आहेत. स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णात ( Nagpur swine flu Update ) मागील काही दिवसापासून सातत्याने वाढ होत आहे. महानगरपालिका साथरोग विभागाकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील वेगवेगळया भागात निवासी असलेले एकूण 18 रुग्णाचे प्रयोगशाळा तपासणीत अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आजार सौम्य पण दुर्धर आजारी व्यक्तीने काळजी घेण्याची गरज - स्वाईन फ्लू हा तसा सौम्य आजार असला, तरी जोखमीचे गटातील जसे जेष्ठ नागरीक, गर्भवती स्त्रिया, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा प्रतिकारशक्ती कमी असणा-या व्यक्तीमध्ये हा आजार गंभीर स्वरुप धारण करु शकतो. त्यामुळे जीवाला धोका सुध्दा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या सहज न घेता सतर्क राहावे, असे आवाहन साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले आहे.

औषध उपलब्ध पण वेळीच रुग्णालयात पोहचणे आवश्यक - स्वाईन फ्लूवर खात्रिशीर औषधोपचार असल्याने भीतीचे काही कारण नाही. पण त्यासाठी लवकरात व लवकर निदान होणे गरजेचे आहेत. सर्दी- ताप, घसा दुखणे, अंगदुखी यासारखे फलू सदृष्य लक्षणे असल्यास कोविड ( Covid ) सोबत स्वाईन फ्लू ( Nagpur swine flu Update ) तपासणी करणे आवश्यक आहे. नागपूर मनपाचे रुग्णालय आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ही तपासणी मोफत केली जात आहे. सध्यास्थितीत शहरात २० रुग्णाबाबत माहिती मिळाली असून त्यापैकी ८ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर १२ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत.

स्वाईन फ्लूच्या बचावासाठी हे लक्षात ठेवा - वेळोवेळी हात सातत्याने साबण व पाण्याने धुवत राहावेत. लोकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. स्वाईन फ्लू रुग्णापासून सामाजिक अंतर ठेवावे. खोकलताना आणि शिंकताना तोंडाला रुमाल लावून आजार पसरणार नाही, याची काळजी घ्यावी. दिवसभर भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी, पौष्टीक आहार घ्यावा. पण कोरोना प्रमाणेच काही बाबी टाळाव्यात असाही वैदकीय सल्ला दिला जात आहे. मनपाकडून स्वाईन फ्लू, मंकीपॉक्स आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन मनपाकडून केले जात आहे.

हेही वाचा - Sushma Andhare : राष्ट्रवादीच्या नेत्या सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंना भेटून बांधणार शिवबंधन

हेही वाचा - Pune Indira Gandhi Market : पुणेकरांची गटारी फुल्ल जोशात; आखाडा निमित्त वनराज कोंबड्याची मार्केटमध्ये मागणी

Last Updated : Jul 28, 2022, 10:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.