ETV Bharat / city

दिल्लीला गांजा घेऊन जाणाऱ्या तस्कराला नागपूर पोलिसांनी पकडले, कारसह ९९ किलो गांजा केला जप्त - marijuana smugglers i9n nagpur city

विशाखापट्टणम येथून गांजा घेऊन दिल्लीला निघालेली कार नागपूर पोलिसांनी पकडली आहे. या कारमध्ये १०० किलो गांजा आढळून आला आहे. त्याची किंमत १५ लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकजणाला अटक केली आहे. जावेद अहमद नईम अहमद (३०) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

गांजा तस्करासह, गांजा, जप्त केलेली कार आणि बेलतरोडी पोलीस

author img

By

Published : Aug 30, 2021, 3:36 PM IST

नागपूर - विशाखापट्टणम येथून गांजा घेऊन दिल्लीला निघालेली कार नागपूर पोलिसांनी पकडली आहे. या कारमध्ये १०० किलो गांजा आढळून आला आहे. त्याची किंमत १५ लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकजणाला अटक केली आहे. जावेद अहमद नईम अहमद (३०) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो दिल्लीचा रहिवासी असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, गांजा तस्करी प्रकरणाच्या सुत्रधाराचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव

९९ किलो ३३० ग्रॅम इतक्या वजनाचा गांजा जप्त

या गांजा तस्करीबाबत खबऱ्याकडून बेलतरोडी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी जबलपुर बायपास आउटर रिंग रोडजवळ वेळाहरी गावालगत सापळा रचला. दरम्यान, ज्या गाडीबाबत माहिती मिळाली होती ती गाडी दिसताच पोलीस पथकाने ती कार थांबवली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये ९९ किलो ३३० ग्रॅम इतक्या वजनाचा गांजा आढळून आला. तो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १५ लाख इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांनी ही कारही जप्त केली आहे.

सुलतानपुरीचा गोलूचा शोध सुरू

गेल्या दोन वर्षांपासून गांजा तस्करांनी गांजाची तस्करी करण्यासाठी महागड्या कारचा उपयोग सुरू केला आहे. यापूर्वी प्रवासी ट्रेनच्या स्लीपर कोचमधून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जायची. मात्र, रेल्वे सुरक्षा पथकाने अनेक वेळा कारवाई करून मोठा मुद्देमाल जप्त केल्याने तस्करांनी कारचा उपयोग सुरू केला आहे. गांजा तस्करीचा मास्टरमाईंड हा दिल्लीच्या सुलतानपुरीचा गोलू नामक व्यक्ती असल्याची माहिती समोर आल्याने, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.