ETV Bharat / city

Nagpur Congress Agitation : 'आमचा खून करा तरी आम्ही घाबरणार नाहीत'; नागपुरात कॉंग्रेसचे आंदोलन, मंत्र्यासह पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात

काँग्रेसच्यावतीने नागपूरच्या ईडी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन ( Nagpur Congress Agitation ) केले. सुमारे तीन तास काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर धरणे प्रदर्शन केले. यावेळी नागपूर पोलिसांनी अनेक बड्या नेत्यांना ताब्यात घेतले होते. ( Congress Leaders arrested in Nagpur )

नागपुरात कॉंग्रेसचे आंदोलन
author img

By

Published : Jun 13, 2022, 4:17 PM IST

नागपूर - नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांना नोटीस दिल्यानंतर आज (सोमवारी) काँग्रेसच्यावतीने नागपूरच्या ईडी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन ( Nagpur Congress Agitation ) केले. सुमारे तीन तास काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर धरणे प्रदर्शन केले. नेत्यांची भाषण संपातच अचानक शेकडो कार्यकर्ते पेंडॉलमधून अचानक ईडी कार्यालयाच्या मुख्य दाराकडे धावत गेले. पोलिसांनी अगोदरच कडेकोट बंदोबस्त लावून ठेवला. यावेळी बॅरिकेट खाली पाडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाच्या मुख्य दारावर चढून आत शिरण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना अडवले.

नागपुरात कॉंग्रेसचे आंदोलन
नितीन राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, प्रतिभा धानोरकर अभिजित वंजारी यांच्यासह माजी मंत्री वसंत पुरके, शिवाजीराव मोघे यांच्यासह अनेक आजी-माजी मंत्री आणि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. अचानकच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यलयाच्या मुख्य दाराच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांसोबत धक्काबुक्की झाली. पोलिसांनी धरणे प्रदर्शनाचा पेंडॉल सोडून ईडी कार्यालयाच्या मुख्य दारातून आत शिरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पालक मंत्री नितीन राऊत यांच्यासह विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी, प्रतिभा धानोरकर यांच्यासह माजी मंत्री वसंत पुरके व शिवाजीराव मोघे यांना ताब्यात घेतले. नेत्यांसह सुमारे 40 ते 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Nagpur Congress Agitation
नागपुरात कॉंग्रेसचे आंदोलन

आमचा खून केला तरी घाबरणार नाही - मंत्री विजय वडेट्टीवार

आम्ही आता घाबरणार नाही, आमचा खून केला तरी करा आम्ही आता घाबरणार नाही, या देशातील लोकशाही खतम करून हुकुमशाही आणण्याच्या जर कोणी प्रयत्न करत असेल त्याला काँग्रेसचा कार्यकर्ता संपविल्याशिवाय राहणार नाही. यावेळी हा विडा घेऊनच आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे, असा इशाराही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना दिला आहे.

काँग्रेसचा आमदार जीव देऊ शकतो - नितीन राऊत

देशात हिटलर शाही सुरू आहे. देशातील कायदा सुव्यवस्था ढासळून पडली. सगळेंच रस्त्यावर पडले आहे. हा फक्त ट्रेलर आहे, पिचर अजून बाकी आहे असे ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणालेत. ईडीची धाक दाखवून काही आमदारांना विकत घेऊ शकता, पण कॉंग्रेसचा आमदार जीव देऊ शकतो. कितीही ताकद दाखवा, नोटीस द्या, घाबरवण्याचा प्रयत्न केला तर कॉंग्रेसचा कार्यकर्ता घाबरणार नाही. किती केसेस लावून अंत पाहणार आहे. आमच्या पक्षाचे कार्यक्रते रस्त्यावर उतरले असते, तर आग लागली असती, पण काँग्रेसने जनतेला त्रास होऊ नये म्हणून संयम बाळगला आहे असेही नितीन राऊत म्हणाले.

माजी मंत्री वसंत पुरके यांची खरखमीत टीका - "2014 मध्ये चमत्कार झाले आणि एक फेकू नेतृत्व समोर आले. काँग्रेस इंग्रजांना घाबरले नाही, तर यांना काय घाबरणार. पिसाळलेल्या कुत्र्यासारखे काँग्रेसला वागता येत नाही, पण हे पिसाळलेल्या कुत्र्यासारखे अंगावर येत आहे. ज्यांच्या घरी पोर बाळ होत नाही. त्यांनी माझे घरचे आंबे खावे, माहित नाही मोदी कोणत्या आंबे खाऊन जन्माला आला आहे, असे वादग्रस्त वक्तव्यही माजी मंत्री वसंत पुरके यांनी केले. नरेंद्र मोदी पत्रकारांसमोर का येत नाहीत, संसदेत बोलतात, पत्रकारांसोबत बोलत नाहीत. आम्हाला मोदी सारखे वागता येत नाही, मात्र तसे वागलो असतो तर हे दोन्ही नालायक गुंड तुरुंगात राहिले असते." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Nagpur Congress Agitation
नागपुरात कॉंग्रेसचे आंदोलन

हेही वाचा - Nana Patole : 'ब्रिटीशांप्रमाणे केंद्रातील सरकार...'; राहुल गांधींच्या ईडी नोटीसवरुन पटोलेंची भाजपावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.