ETV Bharat / city

'त्या' दोन खासदारांविरोधातील याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली

author img

By

Published : Aug 20, 2021, 10:40 PM IST

वर्धाचे खासदार रामदास तडस आणि बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधातील ही याचिका होती, यातून त्यांना दिलासा मिळाला आहे.

नागपूर खंडपीठ
नागपूर खंडपीठ

नागपूर - लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा गोंधळ आणि मतदान, मतमोजनी दरम्यान मतांची तफावत संदर्भात दाखल याचिका नागपूर खंडपीठाने अखेर फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी ही याचिका फेटाळली आहे. वर्धाचे खासदार रामदास तडस आणि बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधातील ही याचिका होती, यातून त्यांना दिलासा मिळाला आहे.

काय आहे प्रकरण?

2019 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस व बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा विरोधात वंचित आघाडीचे उमेदवार धनराज वंजारी, बळीराम शिर्शीकर यांनी निवडणुकीत आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. ईव्हीएम मशीन, तसेच मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवरील मशीन बंद पडल्या होत्या, त्यावेळी तक्रार करून सुद्धा दोष पूर्ण ईव्हीएम मशीन बदलण्यात आले नव्हते, असा दावाही करण्यात आला होता. ईव्हीएम मशीनमधून मतदानाच्या वेळी मॉक डेटा काढण्यात आला नाही. प्रत्यक्षात झालेले मतदान आणि ईव्हीएम मशीनमध्ये नोंदविण्यात आलेले मतदान यामध्ये मोठी तफावत असल्याचाही आरोप वंचीत बहुजन पक्षाचे पराभूत उमेदवारा धनराज वंजारी आणि बळीराम शिर्शीकर यांनी केला होता. यात निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी भाजपा व शिवसेनेचे उमेदवार यांनी मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे या निवडणुकांना अवैद्य घोषित करण्यात यावे, अशी मागणी याचिकेमधूम करण्यात आली होती.

नागपूर खंडपीठाने 30 जुलैला यामध्ये संबंधितांना नोटीस बाजावण्यात आली. यामध्ये निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली होती. यात निवडणूक आयोगाकडून सुनावणी दरम्यान वकिल नीरजा दुबे यांनी बाजू मांडली. यावेळी या याचिका गुणवत्ताहीन असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. यामुळे या दोन्ही याचिका फेटाळण्यात आले आहेत. यामध्ये खासदार रामदास तडस यांच्याकडून फिरदोस मीर्झा यांनी बाजू मांडली होती.

हेही वाचा - राज्यातील कुचकामी सरकार कसे लवकर जाईल यासाठी कामाला लागा; नारायण राणेंचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.