नागपूर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान मनसे भाजपा (MNS chief Raj Thackeray statement) युतीबाबत आम्ही काहीही बोललो नाही. या चर्चा फक्त वर्तमानपत्रात रंगल्या आहेत, असे विधान राज ठाकरेंनी केले (MNS chief Raj Thackeray statement on MNS BJP alliance nagpur) आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बावनकुळे कुटुंबीयांनी राज ठाकरेंचे स्वागत केले. सद्या ठाकर यांचा विदर्भ दौरा सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे व राज ठाकरे यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी नागपूर भेटीत घरी या,असे निमंत्रण दिले होते. त्यानुसार ठाकरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी बावनकुळे कुटुंबीयांसोबत मनमोकळ्या गप्पा (Raj Thackeray meet Bawankule) केल्या.
मनसे भाजपा युतीच्या चर्चा फक्त वर्तमानपत्रात रंगल्या : राज्याच्या राजकारणात काय सुरू आहे, नेमकं तेच कळत नसल्याचं ते म्हणाले आहेत. निवडणूकीपूर्वी चार भिंती आड दिलेला शब्द मतदानाच्या निकालानंतर जनतेपुढे सांगितलं जातो. याला काय अर्थ आहे ? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. यासर्व परिस्थितीवर मनसेचं लक्ष आहे, म्हणूनच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याची तयारी करा, असा कानमंत्र दिला (MNS BJP alliance nagpur) आहे.
मनसेला विदर्भाकडून आशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होऊन 16 वर्षे झाले आहेत. मात्र, या सोळा वर्षात नागपूरसह विदर्भात पक्षाची जी ताकद दिसायला हवी होती, ती दिसत नसल्याचे राज ठाकरे यांनी मान्य केलं. त्यामुळेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विदर्भाकडे लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. गेल्या काही वर्षात मनसे पदाधिकाऱ्यांसोबतच माझे देखील विदर्भाकडे दुर्लक्ष झाले होते. भेटीगाठी कमी झाल्या होत्या, मात्र पुढच्या काळात मी विदर्भात येत राहील आणि इथे पक्षबांधणीवर भर देईल, असे त्यांनी सांगितले आहे.
यांनी मतदारांचा अपमान केलाय : निवडणुकीच्या पूर्वी मांडलेले मुद्दे आणि राजकीय पक्षांचा अजेंडा बघून जनतेने मतदान केलं होतं, मात्र निकालानंतर वेगळचं समीकरण तयार होतं, हा जनतेचा अपमान असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. निकालानंतर कोण कोणासोबत जातो, कधी ही जातोय याचा आता नेम उरलेला नाही. पहाटे शपथ काय घेतली जाते. चार भिंती आड कधीही न ठरलेल्या गोष्टी सांगून २५ वर्ष जुनी मैत्री तोडून अजन्म विरोधक राहिलेल्यांना सोबत घेऊन सरकार स्थापित केली जाते. हा गोंधळ राज्याच्या राजकारणात यापूर्वी कधीही बघितलेला नाही, ही एका प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात आणि प्रताडणा असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.