ETV Bharat / city

आदिवासी बांधवांना खावटी वाटपाच्या कार्यक्रमात आमदारांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास, व्हिडिओ व्हायरल - nagpur latest

आदिवासी बांधवांना खावटी वाटप करताना कोरोना नियमांची पायमल्ली करत शेकडो आदिवासींना एका लहानशा अंधाऱ्या खोलीत कोंबल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघाचे आमदार आशिष जयस्वाल चांगलेच संतापले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ वायरल
व्हिडीओ वायरल
author img

By

Published : Aug 2, 2021, 8:41 PM IST

नागपूर - आदिवासी बांधवांना खावटी वाटप करताना कोरोना नियमांची पायमल्ली करत शेकडो आदिवासींना एका लहानशा अंधाऱ्या खोलीत कोंबल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघाचे आमदार आशिष जयस्वाल चांगलेच संतापले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आदिवासी बांधवांना खावटी वाटपाच्या कार्यक्रमात आमदारांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास, व्हिडिओ व्हायरल

'यापुढे अधिकाऱ्यांनी गावात जाऊन खावटीचे वाटप करावे'

रामटेक येथे आयोजित कार्यक्रमात खावटी वाटपाचे नियाेजन नसल्याने आदिवासी बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार मिळताच आमदार आशिष जयस्वाल यांनी अक्षरशः अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाने घालून दिलेल्या कोविड नियमांचे पालन होत नसल्याने पुन्हा कोरोनाचा उद्रेक होईल, शिवाय गर्दी गोळा झाल्याने आदिवासी बांधवांची गैरसाेय होत असल्याने यापुढे अधिकाऱ्यांनी गावात जाऊन खावटीचे वाटप करावे, असे निर्देश आमदार आशिष जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यानंतर खावटी वाटप करताना माझ्या आदिवासी बांधवावर हाेणारा त्रास मी अजिबात सहण करणार नसल्याचा दम देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

व्हिडीओ वायरल
आमदार आशिष जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना धारेवर झाल्याचा व्हिडीओ त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. ज्यामध्ये आशिष जयस्वाल यांनी कशाप्रकारे अधिकाऱ्यांचा वर्ग घेतला हे स्पष्ट दिसून येत आहे.

हेही वाचा - 12th Result : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, 'या' वेबसाईट्सवर बघा तुमचा निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.