नागपूर - पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीस यांचा पोपट चिठ्ठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करण्याचं काम करतात त्यामुळे नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही, असा पलटवार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. ते नियोजित बैठकीसाठी गोंदियाला जात असताना नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एसीबीच्या कारवायांवर टीका केली.
देवेंद्र फडणीस यांनी समीर वानखेडे प्रकरणावर ते दिवसभर बोलत असतात. मलिक यांनी समीर वानखेडे हा भाजपचा पोपट आहे, असे म्हटले होते. यावर नवाब मलिक हे पोपट असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यालाच नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर देत माझा पोपटाचा धंदा नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने अशा पद्धतीने कारवाया करत शंभरपेक्षा अधिक लोकांना 26 खोट्या केसमध्ये अडकवले आहे. एनसीबीचे अधिकारी फर्जिवडा केसेस करून हजारो कोटी खंडणी वसुली करण्याचे काम करत असल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल अधिकाऱ्यांच्या खोट्या कारवाईंना थांबवण्याचे काम माझे आहे. ते कर्तव्य म्हणून मी शेवटपर्यंत पार पाडणार, असेही माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यावेळी म्हणाले.
पोपटाचा धंदा माझा नाही.. नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही - अल्पसंख्यांक मंत्री - नवाब मलिकांची देवेंद्र फडणवीसांची टीका
पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीस यांचा पोपट चिठ्ठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करण्याचं काम करतात त्यामुळे नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही, असा पलटवार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.