ETV Bharat / city

India vs Australia Cricket Match : न्यू एयरपोर्ट स्टेशन येथून सामना संपल्यानंतर रात्री १ वाजेपर्यंत मेट्रो सेवा - भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया ( India vs Australia Cricket Match ) दरम्यान जामठा येथे होऊ घातलेला सामना बघण्याकरीता आलेल्या क्रिकेट प्रेमींकरता महामेट्रोने विशेष सोय ( Mahametro special facility for cricket lovers) केली आहे.

New Airport Metro Service
न्यू एयरपोर्ट मेट्रो सेवा
author img

By

Published : Sep 23, 2022, 11:10 AM IST

नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया ( India vs Australia Cricket Match ) दरम्यान जामठा येथे होऊ घातलेला सामना बघण्या करीता आलेल्या क्रिकेट प्रेमींकरता महामेट्रोने विशेष सोय केली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या ( Vidarbha Cricket Association ) विनंतीनुसार, महा मेट्रोने न्यू एअरपोर्ट स्टेशन येथून मेट्रो गाड्या चालवण्याची व्यवस्था केली आहे. सामना संपल्यावर एक वाजे पर्यंत मेट्रो तर्फे गाड्या चालणार असून प्रेक्षकांना या माध्यमाने आपल्या गंतव्यावर पोहोचणे सुकर होणार आहे.

मेट्रो सेवा उपलब्ध : ऑरेंज आणि एक्वा लाईन वरील नियमित प्रवासी मेट्रो सेवा रात्री १० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. सामना संपल्यानंतर रात्री १ वाजे पर्यंत, न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथून इतर सर्व कार्यरत मेट्रो स्टेशन येथे परत येण्याकरता मेट्रो सेवा उपलब्ध असेल. ऑरेंज मार्गावर प्रवास करणारे क्रिकेट प्रेमी सीताबर्डी इंटरचेंज येथून एक्वा मार्गिकेवर प्रवास करण्याकरता गाडी बदलू शकतात.

तेव्हाच रिटर्न घ्या सोयीचे : सामना बघण्याकरता जातानाच प्रवासी ज्या स्थानकावरून मेट्रो गाडीत बसतील तेथून त्यांनी त्याच वेळेला परतीचे तिकीट (रिटर्न) देखील खरेदी करण्याचे आवाहन महा मेट्रोने केले आहे. तिकीट अगोदर घेतले असेल तर परतीच्या प्रवासात तिकीट घेण्याची गरज पडणार नाही आणि प्रवाश्यांच्या वेळेची बचत देखील होणार असल्याने हि व्यवस्था केली आहे.

६० बसेसची व्यवस्था : सामना सुरु होण्याच्या आधी न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते व्हीसीए स्टेडियम जामठा आणि संपल्यावर जामठा ते न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत प्रेक्षकांना नेण्यासाठी ६० बसची व्यवस्था विदर्भ क्रिकेट असोसिएशनने केली आहे. क्रिकेट रसिकांच्या सोयीकरता होणाऱ्या या सोयीचा लाभ त्यांनी घ्यावा हे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे. या मुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळता येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.