ETV Bharat / city

एमडी ड्रग्सची तस्करी करणारी टोळी गजाआड, ५ लाख किमतीचे ड्रग्स जप्त - गुन्हे दाखल

शहरातील सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही लोक एमडी ड्रग्ज घेत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती.

एमडी ड्रग्सची तस्करी करणारी टोळी गजाआड
author img

By

Published : Jul 15, 2019, 3:44 PM IST

नागपूर - शहरात एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या टोळीला सक्करदरा पोलिसांनी जेरबंद केले आहे. यामध्ये ७ आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून एमडी ड्रग्ससह ५ लाख ८८ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधाराच्या शोध सुरु आहे.

एमडी ड्रग्सची तस्करी करणारी टोळी गजाआड

शहरातील सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही लोक एमडी ड्रग्ज घेत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी सापळा रचला होता. पोलिसांना मिळालेली माहिती खरी आहे, असे कळल्यावर पोलिसांनी छापा टाकत एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.

एका कारमधून ही तस्करी केली जात होती. याप्रकरणी, पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या जवळ ५ लाख रूपये किमतीचा १९.४६ ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आला आहे. हे ड्रग्स छोट्या प्लास्टिकमध्ये पॅक केले होते आणि त्याची डिलिव्हरी शहरातच एका ठिकाणी केली जाणार होती. मात्र, पोलिसांना याची कुणकुण लागताच या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलीस आता मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहे.

या प्रकरणातील आरोपींवर याआधीही अनेक गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आधीही त्यांनी व्यवसाय केला आहे. पोलीस आता त्यांची सखोल चौकशी करत आहेत.

Intro:नागपूरच्या सक्करदरा पोलिसांनी एमडी ड्रग ची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक केली असून यात ७ आरोपिंचा समावेश आहे.....पोलिसांनी आरोपींकडून एमडी ड्रग्स सह ५ लाख ८८ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला ... सूत्रधाराच्या शोध सुरु Body:नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एमडी ड्रग्ज घेऊन काही लोक असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती... त्यानंतर आणि पोलिसांनी आरोपींच्या अटके करिता सापळा रचला होता.... पोलिसांना मिळालेली माहिती तंतोतंत खरी ठरताच पोलिसांनी छापेमार कारवाई करून एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला ... एका कार मधून हि तस्करी केली जात होती .. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपीना अटक केली त्यांच्या जवळ १९ . ४६ ग्राम एमडी ड्रग्ज आढळून आल,ज्याची किंमत ५ लाखाच्या घरात आहे .. ड्रग्स छोट्या प्लास्टिक मध्ये पॅक केलं गेलं होत आणि त्याची डिलिव्हरी नागपुरात दिली जाणार होती मात्र पोलिसांना याची कुणकुण लागताच या टोळीचा पर्दाफाश झाला ... पोलीस आता मुख्यसूत्रधाराचा शोध घेत आहे ....या प्रकरणातील आरोपी हे कुख्यात आहे यांच्यावर अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत .. या आधी सुद्धा यांनी हा व्यवसाय केला आहे .. पोलिसांनी आता यांची कुंडली काढायला सुरवात केली आहे मात्र हे कोणाला देणार होते आणि कुठून आणत होते याचा शोध घेणे सुद्धा महत्वाचं आहे

बाईट -- राजतिलक रोशन -- डीसीपी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.