ETV Bharat / city

नागपुरात पावसाळ्यापूर्वी नदी-नाल्यांची स्वच्छता करा-महापौर

author img

By

Published : May 19, 2021, 7:03 AM IST

शहरामधून वाहणाऱ्या नद्यांसह शहर हद्दीतून वाहणाऱ्या सर्व नाल्यांच्या संपूर्ण स्वच्छतेचे कार्य येत्या पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत. त्यांनी दहाही झोनच्या कार्याचा आढावा घेतला आहे.

महापौरांचे नद्या-नाले साफ करण्याचे आदेश
महापौरांचे नद्या-नाले साफ करण्याचे आदेश

नागपूर - नागपूर शहरामधून वाहणाऱ्या नाग, पिवळी व पोहरा या तिनही नद्यांसह शहर हद्दीतून वाहणाऱ्या सर्व नाल्यांच्या संपूर्ण स्वच्छतेचे कार्य येत्या पावसाळ्यापूर्वीच म्हणजेच ३० मे पूर्वी पूर्ण करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत. नदी व नाले स्वच्छता अभियानांतर्गत सुरू असलेल्या कार्याचा महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये व्हर्च्यूअल बैठकीमध्ये आढावा घेतला. यात महापौर दयाशंकर तिवारी व निगम सचिव डॉ. रंजना लाडे उपस्थित होते.

पावसाळ्यापूर्वी नदी आणि नाले महापौरांचे आदेश स्वच्छता करण्याचे

नदीच्या सफाईचे अर्धे काम पूर्ण

प्रारंभी मुख्य अभियंता मनोज तालेवार यांनी झोन निहाय नदी स्वच्छतेच्या कार्याची तर उपायुक्त डॉ.प्रदीप दासरवार यांनी नाले सफाईच्या कार्याची माहिती दिली. आतापर्यंत पोहारा नदीच्या सफाईचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, ३५ टक्के शिल्लक आहे. तर पिवळी नदीची ६० टक्के सफाई झाली असून, ४० टक्के शिल्लक आहे. नाग नदीच्या स्वच्छतेचे ५७ टक्के कार्य झाले, असून ४३ टक्के कार्य शिल्लक आहे.

232 पैकी 125 नाल्यांच्या सफाईचे कामकाज पूर्ण

याशिवाय शहरात एकूण २३२ नाले आहेत. या २३२ नाल्यांपैकी १५५ नाल्यांची मनुष्यबळाद्वारे तर ७७ नाल्यांची मशीनद्वारे सफाई करावी लागते. आतापर्यंत मशीनद्वारे २१ नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. तर मनुष्यबळाद्वारे १०४ नाल्यांची सफाई पूर्ण करण्यात आली आहे. एकूण २३२ पैकी १२५ नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे. सोबतच मोठ्या नाल्यांसाठी मशीनद्वारे काम सुरू आहे. हे सर्व कार्य प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास प्रशासनाद्वारे व्यक्त करण्यात आला.

गाळ आणि मातीचा उपयोग रस्ते दुभाजकावर झाडे लावण्यासाठी

नदी स्वच्छतेदरम्यान नदीमधून काढण्यात येणारा गाळ, माती तशीच पडून राहू नये याबाबत विशेष काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. 'सनदीमधून काढण्यात येणाऱ्या मातीचा उपयोग रस्ता दुभाजकांवर झाडे लावण्यासाठी केला जावा, याशिवाय नदीमधील माती काढण्यासाठी दरवर्षी काही भागातील नदीची सुरक्षा भींत तोडावी लागते हे योग्य नाही. त्यामुळे त्याठिकाणी भींतीला गेट बसवून आराखडा तयार करण्यात यावा', असे सांगण्यात आले.

चांगल्या कामाचे केले कौतुक

सतरंजीपूरा झोनचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. याठिकाणी २२ नाले असून यापैकी १८ नाल्यांची मुदतीपुर्वीच सफाई करण्यात आलेली आहे. झोनच्या स्वच्छता पथकाचे कार्य हे स्तूत्य असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. मनपाचे उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार आणि सतरंजीपूरा झोनचे अधिकारी यांचेही विशेष अभिनंदन केले.

नदीकाठावर वृक्षारोपण करा

नदी स्वच्छता अभियानासोबतच यावर्षी तीनही नद्यांच्या काठावर वृक्षारोपणचे नियोजन करा. वृक्षरोपणाला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोहरा नदीपासून सुरूवात केली जाणार आहे. यामध्ये फळ, औषधींची झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच वृक्षारोपणात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी स्मृती वृक्ष, ग्रह उद्यान, नक्षत्र उद्यान, वन औषधी, फळ वृक्षारोपण करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत. नागरिकसुध्दा वृक्षांचे जतन व संवर्धन करतील.

व्हर्च्यूअल पद्धतीने पार पडली बैठक

व्हर्च्यूअल पद्धतीने स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, उपनेत्या वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी सत्तापक्ष नेता संदीप जाधव, नगरसेवक प्रदीप पोहाणे, विक्रम ग्वालबंशी, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. प्रदीप दासरवार, मुख्य अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, विजय हुमने, अशोक पाटील, सहायक आयुक्त सुषमा मांडगे, साधना पाटील, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, अविनाश बारहाते, अविनाश भुतकर यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी या बैठकीसाठी जुळले होते.

हेही वाचा - 'म्यूकरमायकोसिस'ची औषधे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात; काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.