नागपूर - विधान परिषदेच्या (Maharashtra MLC Election Results 2021) सहापैकी चार जागा भारतीय जनता पक्षाचे निर्विवादपणे जिंकल्या आहेत. चार पैकी दोन जागा अविरोध झाल्या होत्या तर नागपूर आणि अकोला येथे निवडणूक झाली. या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या आहेत. नागपूर विधान परिषदच्या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी 176 मतांनी दमदार विजय नोंदवला तर अकोला येथे सुद्धा भाजपचे उमेदवार वसंतभाई खंडेलवाल यांनी निर्णायक विजय संपादित केला आहे. बावनकुळे यांच्या विजयाच्या जल्लोषात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील (Devendra Fadanvis on MLC Election Result 2021) सहभागी झाले होते. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढली म्हणजे विजय मिळतो हा भ्रम देखील आज आम्ही तोडला असल्याची खोचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
विदर्भातील नागपूर आणि अकोला विधान परिषदेच्या दोन्ही महत्वपूर्ण जागा भाजपच्या (Maharashtra MLC Election Results )पदरात पडल्या असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. आजचा विजय म्हणजे भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाची नांदी असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. राजकारणात पॉलिटिकली अर्थमॅटिक चालत नाही तर केमिस्ट्री आवश्यक असते, असा टोला फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना लावला आहे
MLC Election Results 2021 : राजकारणात अर्थमॅटिक नाही तर केमिस्ट्री काम करते, ही भाजपच्या भविष्यातील विजयाची नांदी - फडणवीस
विधान परिषद निवडणुकांच्या (Maharashtra MLC Election Results ) दोन जांगांचे निकाल आज जाहीर झाले. भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत नागपूर पाठोपाठ अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात विजय मिळवला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणात पॉलिटिकली अर्थमॅटिक चालत नाही तर केमिस्ट्री आवश्यक असते, असा टोला फडणवीस यांनी (Devendra Fadanvis on MLC Election Result 2021) सत्ताधाऱ्यांना लावला आहे. तसेच आजचा विजय भाजपच्या भविष्यातील विजयाची नांदी असल्याचे फडणवीस म्हणाले.