ETV Bharat / city

Dhamma chakra parivartan din : भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना, धम्मचक्र प्रवर्तनदिनी दीक्षाभूमीत लाखो अनुयायांची मांदियाळी

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने नागपूरसह विदर्भातील हजारो अनुयायी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी येऊ लागेल ( followers visit on Dhamma chakra parivartan din ) आहेत.विजयादशमीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता, त्यामुळे लाखो अनुयायी विजयादशमीला दीक्षाभूमीवर येतात. मात्र, ज्यांना शक्य होत नाही ते अनुयायी आजच्या दिवशी देखील दीक्षाभूमी येथे येऊन बाबसाहेबांना अभिवादन करतात.

followers visit on Dhamma chakra parivartan din
लाखो अनुयायी आजच्या दिवशी देखील दीक्षाभूमी येथे येऊन बाबसाहेबांना अभिवादन करतात.
author img

By

Published : Oct 14, 2022, 1:54 PM IST

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने नागपूरसह विदर्भातील हजारो अनुयायी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी ( dikshabhumi in nagpur ) बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी येऊ लागेल आहेत. तारखेनुसार आज धम्मचक्र प्रवर्तन दिवस ( Dhamma chakra parivartan din ) साजरा केला जातो. आजच्या दिवशी जात-धर्माच्या बंदिस्त तटबंदी नाकारून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दिक्षा स्वीकारली होती. आज या घटेनला 66 वर्ष पूर्ण होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता त्यामुळे लाखो अनुयायी विजयादशमीला दीक्षाभूमीवर येतात. मात्र, ज्यांना शक्य होत नाही ते अनुयायी आजच्या दिवशीदेखील दीक्षाभूमी येथे येऊन बाबसाहेबांना अभिवादन करतात.

धम्मचक्र परिवर्तन दिवस - दीक्षाभूमी येथे दरवर्षी १४ ऑक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून उत्साहाने साजरा करतात. दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात पवित्र दीक्षाभूमीसह डॉ.बाबासाहेबांच्या अस्तित्वाच्या अनेक पाऊलखुणा आजही सुरक्षित आहेत. १४ ऑक्टोबर हा बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असल्याने यावर्षी मोठ्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमी दीक्षाभूमीवर येणार आहेत.

दीक्षाभूमी येथे दरवर्षी १४ ऑक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून उत्साहाने साजरा करतात.

१४ ऑक्टोबर दिवसाचे महत्व - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या ५ लाख अनुयायांनाही बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे या पवित्र भूमीला ‘दीक्षाभूमी’ असे नामकरण झाले. दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देतात. मात्र अशोक विजयादशमी किंवा १४ ऑक्टोबर रोजी यांच्या संख्येनत लक्षणीय वाढ होते.

followers visit on Dhamma chakra parivartan din
दीक्षाभूमी येथे दरवर्षी १४ ऑक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून उत्साहाने साजरा करतात.

दीक्षाभूमीचा इतिहास - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतावादी बुद्ध धर्माची दीक्षा १४ ऑक्टोबर १९५६ साली घेतली. ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतली होती. त्या जागेवर सुरुवातीला बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात होता. मात्र, ती जागा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झाली असल्याची भावना आंबेडकरी अनुयायांची असल्याने ती जागा स्मारकासाठी देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने जोर धरत होती. महाराष्ट्र शासनाने जनभावनेचा आदर राखत दीक्षाभूमीची १४ एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला दिली. त्यानंतर १९७८ साली स्तूपाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, संपूर्ण बांधकाम २००१ साली पूर्ण करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला 'अ' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.