नागपूर - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) भारतातील क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी हजारो वर्षापासून सुरू असलेल्या सामाजिक आर्थिक गुलामगिरीला मुक्त करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्याचा बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 ला महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Din 2021) झाले. पण चैत्यभूमी ( Chaityabhoomi ) ही बुद्ध आणि धम्माची शिकवण देणारे स्थान आहे. या स्थानचे आणि दीक्षाभूमी जिथे लाखो अनुयायांनी दीक्षा दिली त्या दोन्ही भूमीचं काय नातं आहे, हे जाणून घेऊन इटीव्ही भारतच्या विशेष वृतांतामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्याचे अभ्यासक प्रकाश खरात यांच्याकडून...
6 डिसेंबर 1956 मध्ये बाबासाहेबांचा मृत्यू झाला आणि मग मुंबई येथे बाबासाहेबांना अग्नी देण्यात आला. त्यादिवशी महाराष्ट्रातुन नव्हे तर देशभरातून लाखो लोक अंतयात्रा मध्ये सामील झालेले होते. पंडित जवाहरलाल नेहरू पासून राजेंद्र प्रसाद सगळ्यांनी बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेत हजेरी लावून त्याच्या कार्याचा गौरव करत अभिवादन केले. याचीच आठवण म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथे चैत्यभूमीवर त्यांचे अस्थीकलश ठेवून चैत्य बांधण्यात आले.
चैत्यभूमी असो की दीक्षाभूमी यांच्यात एक नात आहे -
हे चैत्य हा शब्द बुद्ध संस्कृतीतील एक शब्द आहे. अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये चैत्यगृह बांधलेले असते. त्या स्तुपाला चैत्य म्हणतात. हे चैत्य म्हणजे तथागत बुद्धाला अभिवादन करण्याचा हजारो वर्षांच्या परंपरा आहे. त्याच पद्धतीची स्तुपाहे दीक्षाभूमीला बांधण्यात आली. त्याच पद्धतीने चैत्यभूमीवर चैत्य बांधण्यात आले. त्यामुळे बुद्ध धम्म आणि स्तुप, बुद्धधम्म आणि चैत्य भूमी, बुद्ध धम्म आणि दीक्षाभूमी, दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी असे हे नातं आहे. त्याचं हे नातं म्हणजे समुद्र आणि त्यात उठणाऱ्या लाटामध्ये जे नात आहे, तेच नात चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीमध्ये पाहायला मिळते. हे नातं बाबासाहेबांनी तथागत बुद्धाशी जोडले आहे.
ग्रंथसंपदेवर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेम -
बाबासाहेब यांच्यात त्याग आणि अभ्यासूवृत्ती पाहायला मिळाली. त्याचा ग्रंथवेड मोठं होत. याच ज्ञानाचा बळावर त्यांनी भारताला संविधान दिले. याच आठवणीत लाखो लोक चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन करतात. त्यांनी दिलेल्या शिकवणीचा भाग म्हणून चैत्यभूमी असो की दीक्षाभूमी लोक जेव्हा अभिवादन करतात तेव्हा ग्रंथ घेऊन जाता आणि त्याचे वाचन करतात. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करावा ही ज्योत घेऊन जातात. याचा परिणाम त्यांच्या कुटुंब संस्थेत दिसून येत असल्याचेही प्रकाश खरात सांगतात.
घरातच ग्रंथ वाचून करावे अभिवादन -
कोरोनाच्या काळात चैत्य भूमीवर आजच्या दिवशी जाण्याचा प्रयत्न असतो. लाखो लोक या दिवसात दादरला पोहचून अभिवादन करतात. पण ते पोहचू शकत नसेल तर त्यांनी ग्रंथ वाचन करून अभिवादन करावे, असे साहित्यिक प्रकाश खरात सांगतात.