ETV Bharat / city

झारखंड सरकार पाडण्याचा डाव; 'या' व्यक्तीचे नाव येत आहे पुढे - नागपूर झारखंड सरकार

जयकुमार बेलखोडेने भाजपा नेत्यांच्या मदतीने झारखंड सरकारमधील आमदारांना सरकार पडण्यासाठी पैश्याचे आमिष दिल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी झारखंड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. जयकुमार बेलखोडे हा या षडयंत्राचा मास्टर माईंड असल्याचे बोलल्या जात आहे.

झारखंड सरकार
झारखंड सरकार
author img

By

Published : Jul 27, 2021, 3:42 PM IST

नागपूर - झारखंड सरकार पडण्याच्या षडयंत्रात जयकुमार बेलखोडे नामक व्यक्तीचा नाव पुढे आल्याने सर्वांच्या नजरा नागपूरकडे वळल्या आहेत. जयकुमार बेलखोडे हा दुसरा तिसरा कुणीही नसून टँगो चार्ली सैनिक प्रशिक्षण शाळेच्या नावावर तरुणांची फसवणूक करणारा असल्याचे उघड झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल जवळ त्याचे टँगो चार्ली सैनिक प्रशिक्षण सेंटर होते. सैन्यात भर्ती होण्यासाठी मदत करण्याच्या नावावर त्याने शेकडो तरुणांची फसवणूक केली होती. एवढेच नाही तर लष्कराचा पेपर फोडल्या प्रकरणी २०१४ मध्ये त्याला सीबीआयने अटक केली होती. नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी)मध्ये असिस्टंट कर्नल पदावर काम केल्याने त्याचे सैन्य दलातील काही अधिकाऱ्यांशी संबंध होते. ज्याच्या भरवशावर तो तरुणांना सैन्याच्या लेखी परीक्षेत पास करून देण्याची हमी द्यायचा.

झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीचे सरकार पाडण्यासाठी नागपूरमधून हालचाली सुरू असल्याचा खुलासा झारखंड पोलिसांनी केल्यानंतर या प्रकरणात जयकुमार बेलखोडे नामक व्यक्तीच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. जयकुमार बेलखोडेने भाजपा नेत्यांच्या मदतीने झारखंड सरकारमधील आमदारांना सरकार पडण्यासाठी पैश्याचे आमिष दिल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी झारखंड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. जयकुमार बेलखोडे हा या षडयंत्राचा मास्टर माईंड असल्याचे बोलल्या जात आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या सरकारमधील आमदारांना पैसाचे आमिष दाखवून झारखंड सरकार पाडण्याच्या षडयंत्रात महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा थेट संबंध असल्याचा दावा झारखंड पोलिसांनी केला आहे.

जयकुमार बेलखोडेला सीबीआय ने केली होती अटक

जयकुमार बेलखोडे हा नेमका कोण आहे. याचा आढावा घेतला तेव्हा एक धक्कादायक खुलासा पुढे आला आहे. जयकुमार बेलखोडेला काही वर्षांपूर्वी लष्कराच्या पेपर फोडल्याप्रकरणी २०१४ सीबीआयने अटक केली होती. तो टाँगों-चार्ली नामक लष्कर प्रशिक्षण सेंटर चालवत होते. सैन्य भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या संशयावरून सीबीआयच्या पथकाने छापा मारला होता. सैन्य दलातील जुनिअर ड्युटी क्लर्क, जुनियर ड्युटी सोल्जर आणि जुनियर ड्युटी टेक्निकल स्टाफ अशा पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या पेपर फुटी प्रकरणी नागपूर जिल्ह्यात सैन्य भरतीचे प्रशिक्षण केंद्र चालवणारी एक व्यक्ती सामील असल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले. त्यानंतर सीबीआय ने नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये टेंगोचार्ली सैन्य प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या जयकुमार बेलखोडेला अटक केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.