ETV Bharat / city

विदर्भाच्या मदतीला रेल्वेसह एअरफोर्सचा हातभार, ऑक्सिजन टँकर केले एअरलिफ्ट - Oxygen tanker airlift

ओडिशा राज्यातून ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बुधवारी वायूदलाच्या विशेष विमानाने नागपूर येथून ऑक्सिजनचे रिकामे टँकर रवाना झाले आहेत. पुढच्या 24 तासानंतर रेल्वेने हे टँकर नागपुरात पोहोचणार आहेत

विदर्भाच्या मदतीला रेल्वेसह एअरफोर्सचा हातभार

author img

By

Published : May 6, 2021, 8:31 AM IST

नागपूर - नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाने आता ओडिशा राज्यातून ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बुधवारी वायूदलाच्या विशेष विमानाने नागपूर येथून ऑक्सिजनचे रिकामे टँकर रवाना झाले आहेत. पुढच्या 24 तासानंतर रेल्वेने हे टँकर नागपुरात पोहोचणार आहेत.

भिलाई येथून 110 मॅट्रिक टन ऑक्सिजन नागपूरला पुरवठा होत आहे. पण ऑक्सिजनची वाढती गरज आणि मागणी पाहता आता ओडिशा राज्यातून ऑक्सिजनची गरज भागवली जाणार आहे. यासाठी वायु दलाच्या विशेष विमानाने ऑक्सिजन वाहतूक करणारे टँकर रवाना झाले. पुढील 24 तासात भुवनेश्वर नजीकच्या अंगुळ येथील स्टील प्लांट येथून नागपूरला ऑक्सिजन मिळणार आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणार आहे.

नागपूरला 1 मे रोजी 93 मेट्रिक टन, 2 मे रोजी 220 मेट्रिक टन, 2 मे रोजी 111 मेट्रिक टन, 4 मे रोजी 60 मेट्रिक टन तर पाच मे रोजी 118 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला आहे. नागपूर शहरातील वाढती मागणी, शिवाय नागपूर ग्रामीण व अन्य जिल्ह्याला देखील ऑक्सिजनचा पुरवठा केल्या जात आहे. तरीही ऑक्सिजन साठा अपुरा पडत आहे. यासाठी केंद्राच्या वायू दलाच्या विशेष विमानाची मदत जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे टँकर वायुदलाच्या महाकाय विमानाने रवाना झाले. सर्व टँकर रेल्वेने आणले जाणार आहे.

आर्थिक मदतीचे आवाहन

कोरोनाच्या संसर्ग काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधीची शासनाला आवश्यकता आहे. स्थानिक स्तरावरही मोठ्या प्रमाणात यासाठी निधी उभारला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील व्यावसायिक उद्योजक- संस्थांना सामाजिक दायित्व निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे पत्र सर्व उद्योजक व्यावसायिक संस्थांना पाठवण्यात आले आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन, औषधसाठा व अन्य बाबींची पायाभूत सुविधा, आरोग्य सेवेसाठी साहित्य खरेदी करावे लागत आहे. पुढील अंदाज घेऊन व्यावसायिक संस्थांनी सढळ हस्ते जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हज हाऊसच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर-

राज्य हज समितीचे नागपुरातील हज हाऊसच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. अल्पसंख्यक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या आवाहानावरून सहा मजली इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे.
या इमारतीमध्ये चाळीस खोल्या असून जवळपास सातशे लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. कोविडच्या अनुषंगाने आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.