ETV Bharat / city

म्यूकरमायकोसिस रुग्णवाढीने 'अम्फोटेरिसिन-बी' इंजेक्शनची मागणी वाढली, काळाबाजार सुरू - Mucormycosis patients in nagpur

कोरोनानंतर म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत पोस्ट कोविड रुग्णांमध्ये हा आजार बळावला आहे.

amphotericin B injections
अम्फोटेरिसिन-बी
author img

By

Published : May 12, 2021, 4:08 PM IST

Updated : May 12, 2021, 4:59 PM IST

नागपूर - मागील काही दिवसात कोरोनानंतर म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत पोस्ट कोविड रुग्णांमध्ये हा आजार बळावला असताना रेमडेसिवीरच्या तुटवड्यानंतर फंगल इन्फेक्शनसाठी अँटी-फंगल इंजेक्शन ‘अम्फोटेरिसिन-बी’ची मागणी वाढली आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे.

माहिती देताना हेतल ठक्कर

सध्याच्या काळात कुठल्याही इंजेक्शनची मागणी वाढली की त्याची संधीसाधू लोक काळाबाजार करायला सुरुवात करतात. यात म्यूकरमायकोसिसचे रुग्ण वाढल्याने त्यावरील ‘अम्फोटेरिसिन-बी' या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. हे इंजेक्शन 2600 रुपयांच्या घरात मिळत असताना आता काळाबाजार करत दुप्पट पेक्षा जास्त किमतीत हे इंजेक्शन विकले जात आहे. या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

म्यूकरमायकोसिस हा आजार घातक ठरत असून, यावर उपचारही महाग आहे. विशेष म्हणजे या अँटीफंगल इंजेक्शनमुळे फैलाव रोखण्यास मदत होते. यात साधारण दररोज 6 व्हाल्स डोसेस रुग्णाला दररोज द्यावे लागतात. त्यासाठी एकूण 120 डोसेस लागत असून रुग्णाच्या प्रकृतीप्रमाणे डोसेसमध्ये कमी अधिक प्रमाण असू शकतात.

यापूर्वी या इंजेक्शनची मागणी नव्हती. आता मात्र पोस्ट कोविड रुग्ण आढळून येत असल्याने या इंजेक्शनची मागणी 400 टक्क्यांनी वाढली आहे. या इंजेक्शनचा तुटवडा हा देशभरात झाला आहे. निर्माणकर्त्या 8 ते 10 कंपन्यांकडे नोंदवण्यात आली आहे असेही नागपूर जिल्ह्याचे केमिस्ट अँड ड्रॅगीस्ट असोसिएशनचे सचिव हेतल ठक्कर यांनी सांगितले आहे.

Last Updated : May 12, 2021, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.