ETV Bharat / city

सीडीआरप्रकरणी आवश्यकता वाटल्यास फडणीसांची चौकशी - उद्धव ठाकरे - विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूच्या सीडीआरप्रकरणी एटीएसमार्फत तपास सुरू आहे. आवश्यकता वाटल्यास फडणवीस यांचीही चौकशी केली जाईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे विधानभवनाबाहेर शिवसेना-भाजपमध्ये सामना रंगणार आहे.

Inquiry of devendra Fadnanvis in CDR case

author img

By

Published : Mar 10, 2021, 8:12 PM IST

Updated : Mar 10, 2021, 8:27 PM IST

मुंबई - मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूच्या सीडीआरप्रकरणी एटीएसमार्फत तपास सुरू आहे. आवश्यकता वाटल्यास फडणवीस यांचीही चौकशी केली जाईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे विधानभवनाबाहेर शिवसेना-भाजपमध्ये सामना रंगणार आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप करताना हिरेन यांची हत्या सचिन वझे यांनीच केल्याचा संशय यांनी व्यक्त केला होता. याप्रकरणाचे सीडीआर माझ्याकडे असून माझीही चौकशी करा, असे आव्हान सत्ताधारी पक्षाला दिले होते. मंगळवारी विधानसभेत तर बुधवारी विधानपरिषदेत याचे तीव्र पडसाद उमटले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अंतिम आठवडा आणि शासकीय कामकाज विरोधकांच्या गदारोळात रखडू नयेत, यासाठी मविआ सरकारने सचिन वझे यांची तडकाफडकी बदली केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सीडीआरबाबत विचारले असता, सीडीआर हा मिळवणे हा गुन्हा आहे. तो चौकशीचा भाग असतो. सहजासहजी कोणाकडे उपलब्ध होऊ शकत नाही. परंतु, फडणवीस यांच्याकडे तो असल्यास त्यांनी चौकशीसाठी जमा करावा, असे सांगितले आहे. मात्र अद्याप त्यांनी सीडीआर दिलेला नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. तसेच आवश्यकता भासल्यास सीडीआरबाबत फडणवीस यांनाही चौकशीसाठी बोलवले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, सचिन वझे यांच्या बदलीनंतर सभागृहातील वाद शमला असला तरी शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगणार हे मात्र नक्की.

Last Updated : Mar 10, 2021, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.