ETV Bharat / city

Navatpa 2022 : सर्वाधिक उष्ण 'नवतपा'ला प्रारंभ; काय आहे नवतपा? वाचा, सविस्तर... - नवतपा म्हणजे काय

एकीकडे मान्सूनसाठी ( Monsoon in India ) भारताचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या केरळमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे आजपासून ( बुधवारी ) नागपूरसह विदर्भ आणि मध्यभारतात 'नवतपा'ला ( Navatpa started in Nagpur Vidarbha and Central India ) सुरुवात झाली आहे.

Navatpa 2022
Navatpa 2022
author img

By

Published : May 25, 2022, 6:03 PM IST

नागपूर - एप्रिल आणि मे महिन्यात सूर्यनारायण पूर्ण क्षमतेने तापल्यानंतर आता यावर्षीचा उन्हाळा शेवटच्या टप्यात आला आहे. अंगाची लाही-लाही करण्याऱ्या भीषण उष्णता आणि जीवघेण्या गर्मीपासून कधी सुटका मिळते, याचीच वाट सर्वसामान्य बघतो आहे. एकीकडे मान्सूनसाठी ( Monsoon in India ) भारताचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या केरळमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे आजपासून ( बुधवारी ) नागपूरसह विदर्भ आणि मध्यभारतात 'नवतपा'ला ( Navatpa started in Nagpur Vidarbha and Central India ) सुरुवात झाली आहे. नवतपा म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामातील सर्वात उष्ण नऊ दिवस, या नऊ दिवसांमध्ये तापमान मोजणाऱ्या यंत्रावर पारा जरी कमी दाखवत असला तरी उत्तरेकडील अनेक राज्यांमधून वाहणाऱ्या अतिउष्ण वाऱ्यांमुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण होतो.

आढावा घेताना प्रतिनिधी

नवतपा हा विषय नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आपल्या सोयीसाठी तयार केलेले एक सिस्टीम आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात नवतपा नावाचा कोणताही प्रकार नसतो, अशी माहिती हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. नवतपा संदर्भात अनेक मान्यता आहेत. नवतपातील वातावरणावर पावसाची दिशा आणि दशा कशी राहील याचा अंदाज नागरिक घेत असतात. नवतपाची एकप्रकारे नागरिकांमध्ये काहीशी दहशत निर्माण झाली आहे. या दिवसात एसी आणि कुलर देखील निष्कर्ष ठरतात. मात्र, या वर्षी वातावरणात काहीसा बदल दिसून येत असल्याने नवतपा किती प्रभाव सोडेल हे सुद्धा बघण्यासारखे असेल. नवतपाचे नऊ दिवस संपल्यानंतर मृग नक्षत्राला सुरवात होते. विदर्भात मृग नक्षत्रात पावसाचे आगमन होते.

नवतपा म्हणजे नेमके काय ? : दरवर्षी 24 ते 25 मे दरम्यान नवतपाला सुरुवात होते. नवतपाच्या काळात पृथ्वीवर उष्णता प्रचंड वाढते. हिंदू ज्येष्ठ महिन्यात नवतपा येतो. सूर्य ज्यावेळी 15 दिवसांकरिता रोहिणी नक्षत्रात येतो, त्यातील सुरुवातीच्या नऊ दिवसाला नवतपा, असे म्हटले जाते.

नवतपाला विज्ञानात किती महत्व? : नवतपा हा स्थानिकांनी तयार केलेला विषय आहे. याला हवामान विषयक विज्ञानात कोणताही आधार नाही. नवतपाच्या नऊ दिवसांमध्ये सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडतात. त्यामुळे तापमानात वाढ होत असते, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

नवतपा संदर्भात 'या' आहेत मान्यता : पावसाळ्याची दशा आणि दिशा कशी राहील हे ठरवण्यासाठी नवतपाच्या नऊ दिवसांना फार महत्त्व आहे. या नऊ दिवसांमध्ये पाऊस किव्हा थंड वारे नसल्यास मानसूनचा पाऊस चांगला होईल आणि या दिवसात पाऊस आला तर मानसूनचा प्रवास अडथळ्यांचा असेल अशी मान्यता आहे.

पहिला दिवस तापमान :

मुंबई - 34 डिग्री सेल्सिअस

नागपूर - 39. 4 डिग्री सेल्सिअस

औरंगाबाद - 34.91 डिग्री सेल्सिअस

चंद्रपूर - 34.4 डिग्री सेल्सिअस

वर्धा - 37.8 डिग्री सेल्सिअस

अमरावती - 36.8 डिग्री सेल्सिअस

अकोला - 37.8 डिग्री सेल्सिअस

ब्रम्हपूरी - 37.4 डिग्री सेल्सिअस

जळगाव - 30.2 डिग्री सेल्सिअस

मालेगाव - 34 डिग्री सेल्सिअस

नाशिक - 35.2 डिग्री सेल्सिअस

पुणे - 35.4 डिग्री सेल्सिअस

रत्नागिरी - 33 डिग्री सेल्सिअस

कोल्हापूर - 33.4 डिग्री सेल्सिअस

हेही वाचा - गेल्या 24 तासांत नागपूर शहरातील विविध भागात सहा जणांचा मृत्यू; उष्मघाताची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.