ETV Bharat / city

Dilip Walse Patil on law and order : महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचे काम होत आहे - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - दिलीप वळसे पाटील टीका नागपूर

केंद्र सरकारने जास्त चर्चा करायला पाहिजे ती म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि सीमा सुरक्षेची. पण, या सर्व गोष्टींवरून लक्ष अन्यत्र वळविण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे प्रश्न निर्माण केले आहे. त्यामाध्यमातून महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचे काम केले जात आहे, असा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil on law and order situation ) यांनी केला. ते नागपुरात माध्यमांशी रविभवन ( Dilip Walse Patil comment in Nagpur ) येथे बोलत होते.

Dilip Walse Patil comment in Nagpur
कायदा सुव्यवस्था दिलीप वळसे पाटील प्रतिक्रिया
author img

By

Published : Apr 19, 2022, 1:32 PM IST

नागपूर - केंद्र सरकारने जास्त चर्चा करायला पाहिजे ती म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि सीमा सुरक्षेची. पण, या सर्व गोष्टींवरून लक्ष अन्यत्र वळविण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे प्रश्न निर्माण केले आहे. त्यामाध्यमातून महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचे काम केले जात आहे. काही लोक त्यात सामील आहे, असा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil on law and order situation ) यांनी केला. ते नागपुरात माध्यमांशी रविभवन ( Dilip Walse Patil comment in Nagpur ) येथे बोलत होते.

माहिती देताना गृहमंत्री

हेही वाचा - Litterateur Shripal Sabnis Nagpur : 'जातीयवादी विद्वानांच्या तावडीतून महाराजांची सुटका करण्याची गरज'

हे कोण घडवत आहे, असा प्रश्न विचाराला असता घडविणारे घटक तुम्हाला सर्वाना माहीत. पोलीस तपास करत आहे. अमरावतीत काय घडले, आकोल्यात काय घडले यावर पोलीस चौकशी करत आहे. अमरावती, आकोट या भागांत दंगली घडत आहेत. एका विशिष्ट परिसरामध्ये घटना घडतात, म्हणजे तिथे काही घटक ॲक्टिव्ह आहेत. त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, असे सूतोवाच गृहमंत्री वळसे पाटील यांनी केले.

राज ठाकरे सुरक्षा - केंद्रसरकारकडून काहींना सुरक्षा पुरवली जात आहे, ही एक गंमतीदार गोष्ट आहे. राज्य सरकारच्या सार्वभौम अधिकाराला बाजूला सारून काही व्यक्तींना सुरक्षा पुरवली जाते, हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणालेत. ते पुढे म्हणालेत की, पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या बैठकीत दोन्ही बाजूंच्या सर्व परिणामांचा विचार करून, तपासून घेऊन राज्य सरकारची भूमिका ठरवली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोंलताना दिली.

डीजी आणि सीपी लेव्हलवर बैठक होईल. मग परत एकदा मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर चर्चा करू आणि अंतिम निर्णय घेऊ, असेही दिलीप वळसे पाटील म्हणालेत. यात 3 तारीख, अलर्ट, गोपनीय अहवाल, कायदा सुव्यवस्था बिघडू शकते या विषयांवर बोलताना आम्ही पूर्ण तयारीत आहोत. कुठल्याही परिस्थितीत कायदा व सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही, याची काळजी घेत आहेत. कुठल्याही वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होत असेल, अशांतता निर्माण होत असेल अशी कोणतीही कृती कारवाईस पात्र ठरते. संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

रमझाननंतर दंगली घडेल, असे काही इनपूट आहे का? यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आहे. त्यानंतर उद्या मी मुंबईला गेल्यावर त्यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर नेमकी काय परिस्थिती आहे याबाबत सांगू शकेल. हा विषय कॅबिनेटमध्ये जायची गरज नाही. जे फिल्ड इनपुट मिळत आहे त्यावरून निर्णय घेऊ, असेही दिलीप वळसे पाटील म्हणालेत.

हेही वाचा - CM Uddhav Thackeray : नितीन राऊत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी - मुख्यमंत्री ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.