ETV Bharat / city

Road Accident In Nagpur : ट्रकच्या धडकेत आजोबासह नातवाचा दुर्दैवी मृत्यू, संतप्त जमावाने फोडल्या ट्रकच्या काचा

author img

By

Published : May 4, 2022, 12:25 PM IST

रामदास वनकर यांच्या एका डोळ्यात मोतीबिंदू झाला होता. त्यामुळे ते हुडकेश्वरमधील गजानन नगरातील घरुन डोळ्यावर उपचारासाठी कामठी येथील खासगी रुग्णालयात जात होते. मात्र रुग्णालयात जाताना त्यांना वाळूच्या ट्रकने धडक दिली. या धडकेत त्यांच्यासह त्यांच्या नातवाचा मृत्यू झाला.

Road Accident At Nagpur
अपघातग्रस्त ट्रक

नागपूर - रेतीने भरलेल्या ट्रकच्या मागच्या चाकात दुचाकी अडकल्याने झालेल्या अपघातात आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घटना जुनी कामठी पोलीस स्टेशन जवळील हैदरी चौक परिसरात घडली आहे. रामदास वनकर (60) आणि त्रिशांत वनकर (3) असे मृत्यू झालेल्या आजोबा आणि नातवाचे नावे आहेत. तर या अपघातात मयत झालेल्या रामदास यांची मुलगी गंभीर जखमी झाली असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयात जाताना घडला अपघात - रामदास वनकर यांच्या एका डोळ्यात मोतीबिंदू झाला होता. त्यामुळे ते हुडकेश्वरमधील गजानन नगरातील घरुन डोळ्यावर उपचारासाठी कामठी येथील खासगी रुग्णालयात जात होते. त्याच दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर नागरिक संतप्त, ट्रकच्या फोडल्या काचा - हैदरी चौकात अपघात झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी ट्रकच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. घटनेची माहिती समजताच जुनी कामठी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.