ETV Bharat / city

कोरोनाबाधित अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची रुग्णालयातून पुन्हा कारागृहात रवानगी - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी बातमी

आज अरुण गवळीची तब्येत खालावल्याने त्याला उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) मध्ये दाखल करण्यात आले होते.

nagpur
अरुण गवळीची रुग्णालयातून पुन्हा कारागृहात रवानगी
author img

By

Published : Feb 12, 2021, 4:46 PM IST

नागपूर - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह पाच कैद्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावर नागपुरच्या मध्यवर्ती कारागृहातील वेगळ्या बॅरेकमध्ये उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, आज अरुण गवळीची तब्येत खालावल्याने त्याला उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) मध्ये दाखल करण्यात आले होते. अरुण गवळीला अशक्तपणा जाणवत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली होती. मात्र, मेडिकल रुग्णालयात गवळीचा वैद्यकीय रिपोर्ट सामान्य आल्याने गवळीला पुन्हा कारागृहात आणण्यात आले आहे.

अरुण गवळीची रुग्णालयातून पुन्हा कारागृहात रवानगी

मुंबई येथील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खुन प्रकरणात अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तीन दिवसांपूर्वी अरुण गवळीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे तेव्हापासून गवळीसह पाच कैद्यांवर कारागृहातील वेगळ्या बॅरेकमध्ये उपचार केले जात होते. मात्र, आज गवळीची प्रकृती खालावल्याने कारागृहातील डॉक्टरांनी त्याला लगेच मेडिकल येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात गवळीला मेडिकल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, तपासणीचे अहवाल सामान्य आल्यामुळे गवळीसह पाचही कैद्यांना पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले असून, आता पुढील उपचार कारागृहातच केले जाणार असल्याची माहिती आहे.

खुनाची शिक्षा भोगतोय गवळी

मार्च २००७ साली मुंबईच्या असल्फा भागात शिवसेना नेते आणि नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांचा खून झाला होता. खुनाच्या घटनेत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर २००८ साली अरुण गवळीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१२ मध्ये विशेष न्यायालयाने गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावणी होती. १७ मार्च २०१५ साली अरुण गवळीची नागपुरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली, तेव्हापासून गवळी नागपुरच्या सेंट्रल जेलमध्ये कैद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.