नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विजयदशमी उत्सवात (RSS Vijayadashami celebration) यावर्षी गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. आरएसएसच्या विजयादशमी कार्यक्रमात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

विजयादशमी निमित्त संघाच्या मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यंदा शंभराव्या वर्षांच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यानिमित्ताने हे वर्ष आठवणीत राहावे याउद्देशाने पहिल्यांदा ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आला आहे. (First time in its 92 year history RSS) 92 वर्षांमध्ये इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून महिलेला आमंत्रित करण्यात आले आहे. गिर्यारोहक आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त संतोष यादव यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

कोण आहेत संतोष यादव - संतोष यादव या भारतीय गिर्यारोहक आहेत. माऊंट एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणाऱ्या त्या जगातील पहिली महिला आहे. संतोष यांनी 1993 मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केला होता. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या सर्वात तरुण महिला आहेत. त्यानंतर त्यांनी 1994 मध्ये पुन्हा गिर्यारोहण केले. एव्हरेस्टवर चढाई करण्यात पुन्हा यश मिळवले. दोनदा एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या जगातील एकमेव महिला आहेत. शारीरिक क्षमता आणि तंदुरुस्तीच्या बळावरच त्यांना हे यश मिळवता आले. त्यांचे यश लक्षात घेता भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहेत.