नागपूर - विको कंपनीच्या एमआयडीसीच्या अमर नगर परिसरातील दिगडोह ग्रामपंचायत परिसरात आग लागली आहे. ही आग मध्यरात्रीपासून लागली आहे. आगीत कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
विको कंपनीला लागलेल्या आगीचे अद्याप कारण कळू शकते नाही. ही आग आतील परिसरात पूर्णतः पसरलेली आहे. या आगीमध्ये कंपनीच्या मागील बाजूस असलेली इमारत ढासळलेली आहे. इमारतीचा पूर्ण भाग कोसळल्याने जेसीबीच्या साह्याने मलबा हटविला जात आहे. त्यानंतर पाण्याचा मारा सुरू आहे.
हेही वाचा-Top 10 @ 9 AM : सकाळी नऊपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या!
अग्निशामक बंबाच्या साह्याने आग विझविण्याचे काम मध्यरात्रीपासून सुरू झाले आहे. पण, अजूनही आग धुसमत आहे.
हेही वाचा-यंदाच्या अर्थसंकल्पात किरकोळ व्यापाऱ्यांना उभारी देणारी योजना जाहीर करावी - व्यापारी संघटना
कंपनीमध्ये ज्वलनशील साहित्य असण्याची शक्यता-
कंपनीत सौंदर्य प्रसाधानांचे उत्पादन घेतले जात असल्याने आतमध्ये साहित्य ज्वलनशील असण्याची शक्यता आहे. या आगीवर अद्याप पूर्णतः नियंत्रण मिळालेले नाही. मागील बाजूने सुरुवातीचा भाग हा कोसळला आहे. त्यामुळे अग्नीशामक दलाच्या जवानांना आतमध्ये जाण्यास अडचणी येत आहेत. पण, एकंदर परिस्थिती पाहता मोठे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. अद्याप, आगीचे कारण कळू शकले नाही.
हेही वाचा-दूध डेअरी ते हॉटेल व्यवसाय! नागपूरच्या तरुण उद्योजिकेचा यशस्वी प्रवास