नागपूर - शनिवारी नागपूरमध्ये डीजे लावून एक अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत मोठ्या आवाजात डीजे वाजत होता. मात्र, लोकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. लोक एकमेकांना धीर देत होते. ही अंत्ययात्रा होती, महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत याची. प्रणवने वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा... दिल्ली हिंसाचार : अमित शाह यांनी सूत्रं हाती घेतली, तातडीने बैठक बोलावून घेतला आढावा
राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता असलेला बॉक्सर प्रणव याने अकोला येथील वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रणवची राष्ट्रीय संघात निवड झाली नव्हती. याच नैराश्यातून प्रणवने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. प्रणव जिथे दररोज सराव करायचा त्याच स्टेडियमजवळ त्याने गळफास लावून आत्महत्या केली.
प्रणवने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये 'बाबा मला माफ करा, मी तुमचे स्वप्न पूर्ण केले नाही' असे लिहिले होते. देशासाठी कुस्तीपटू म्हणून मेडल जिंकल्यावर आम्ही डीजे लावू, अशी आमची इच्छा होती. ती इच्छा प्रणवने पूर्ण केली नाही. म्हणून त्याची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही अंत्ययात्रेत डीजे लावून त्याला निरोप दिला, असे प्रणवच्या पालकांनी सांगितले.
हेही वाचा... लोकशाही धोक्यात आणू नका, 'या' मुद्द्यावर अण्णांनी सरकारचे खेचले कान