नागपूर - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मात्र वाढत्या कोरोनावर संपूर्ण लॉकडाऊन हा काही पर्याय होऊ शकत नाही. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडतो, गरिबांचे त्यामुळे मोठे नुकसान होते. त्यामुळे लॉकडाऊन लावण्यात येऊ नये, अशी मागणी आम्ही पालकमंत्र्यांकडे केल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी दिली आहे. आमच्या मागणीला पालकमंत्र्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत आयोजित बैकठीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
लॉकडाऊन ऐवजी वाटल्यास कडक नियम तयार करावे आणि त्याची अंमलबजावणी करून घ्यावी, अशी मागणी आम्ही यावेळी पालकमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. आता नव्या नियमांची घोषणा अधिकृतरित्या पालकमंत्री करतील. लसीकरण केंद्र वाढवण्याबद्दल देखील यावेळी चर्चा झाल्याचे फडवणीस यांनी सांगितले आहे.
खासगी रुग्णालयातील कोविड वार्ड सुरू करावेत
मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना, शहरात खासगी रुग्णालयता कोविडचे वार्ड सुरू करण्यात आले होते, मात्र काही महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याने, कोविड वार्ड बंद करण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हे सर्व वार्ड पुन्हा सुरू करावेत. नागपूरमध्ये कोरोना रुग्णांसाठी असलेल्या बेडची संख्या वाढवावी, अशी मागणी यावेळी आपण पालकमंत्र्यांकडे केल्याचे फडणवीसांनी सांगितले.
हेही वाचा - माझ्या राजीनाम्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही - गृहमंत्री देशमुख