नागपूर - कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन सोबतच टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा वाढवावा अशी मागणी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी रविवारी राज्यशासनाकडे केली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यावेळी उपस्थित होते.
इंजेक्शन अपुरे
एका खासगी कंपनीने ऑक्सिजन प्लाँट उभारण्याबाबत सादरीकरण केले. यावेळी जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा योग्यरित्या होत असला तरी, अधिकच्या तरतूदीसाठी विभागीय आयुक्तांनी लक्ष घालावे, असेही निर्देश दिले. संपूर्ण राज्यासाठी 800 टॉसिलीझुमॅब इंजेक्शन केंद्राकडून येतात. बाधितांची संख्या वाढल्याने इंजेक्शन अपुरे पडत आहे. 5 मे रोजी 105 व त्यापूर्वी 29 एप्रिल रोजी टॉसिलीझुमॅब इंजेक्शन जिल्ह्याला प्राप्त झाले होते. या इंजेक्शनसाठी वाढीव मागणी 'सीपला' कंपनीकडे नोंदविण्यात आली आहे. आज जिल्ह्यात 3322 रेमडेसिवीर इंजेक्शन प्राप्त झाले. शासकीय वितरण आदेशानुसार त्यांचे वितरण करण्यात आले.
हेही वाचा - राज्यात एकाच दिवशी 60 हजार 226 रुग्ण कोरोनामुक्त