ETV Bharat / city

डॉ. विकास महात्मे यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपकरण,आरोग्य क्षेत्राला होणार फायदा

author img

By

Published : Apr 11, 2020, 9:37 PM IST

Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST

रुग्णाची तपासणी करणाऱ्या सहाय्यक आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण होण्याची भीती असते. सततची वाटणारी भीती दूर करण्यासाठी पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी एक सुरक्षा उपकरण तयार केले आहे. ज्याचा वापर केल्यास वैद्यकीय स्टाफला संक्रमण होण्याची शक्यता कमी होते.

gadget-for-safety-to-operating-persons
नाविन्यपूर्ण उपकरण,आरोग्य क्षेत्राला होणार फायदा

नागपूर - कोरोनाचे निदान करताना संशयास्पद रुग्णांच्या घशातील स्रावांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. हे करताना रुग्ण कोरोना बाधित आहे अथवा नाही हे ठाऊक नसते. त्यामुळे ही चाचणी घेणारे डॉक्टर आणि सहाय्यक यांच्या डॉक्टरांना कोरोनाची लागण होण्याची भीती असते. सततची वाटणारी भीती दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी एक सुरक्षा उपकरण तयार केले आहे. ज्याचा वापर केल्यास वैद्यकीय स्टाफला संक्रमण होण्याची शक्यता कमी होते.

डॉ. विकास महात्मे यांच्या संकल्पनेतून तयार झाले नाविन्यपूर्ण उपकरण

गॅझेट फॉर सेफ्टी टू ऑपरेटींग पर्सन्स ( Gadget for Safety To Operating Persons ) असे या उपकरणाला नाव देण्यात आले आहे. या उपकरणाच्या आत तयार करण्यात अलेल्या केबिनमध्ये डॉक्टर आणि सहकारी उभे राहून, संशयित रुग्णाच्या संपर्कात न येता आजारी व्यक्तीच्या घशातील नमुने घेऊ शकतात. त्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांना संपूर्ण संरक्षण मिळेत. न घाबरता आरोग्य कर्मचारी काम करू शकतील.

मुख्य म्हणजे हे करताना त्यांना PPE किट घालण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे या किट वर होणारा खर्च ही कमी करता येणार आहे. डॉ. विकास महात्मे यांच्या संकल्पनेतून हे उपकरण तयार झाले असून त्यांनी स्वखर्चाने तयारदेखील केले आहे. या उपकरणचे लोकार्पण करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला वापरण्यासाठी मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांना हे उपकरण हस्तांतरित करण्यात आले.

Last Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.