ETV Bharat / city

नागपुरात दुहेरी हत्याकांड.. अन्यत्र खून करून मृतदेह नागपूर-कुही मार्गावर फेकले !

नागपूर दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने हादरले आहे. दोघांची हत्या करून मृतदेह नागपूर - कुही मार्गावर फेकल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

double murder in Nagpur
नागपुरात दुहेरी हत्याकांड
author img

By

Published : Nov 16, 2020, 6:28 PM IST

नागपूर - नागपुरात दुहेरी हत्याकांड घडले आहे. रविवारी घडलेल्या वृद्ध चौकीदाराच्या हत्येचे आरोपी अजून सापडले नसताना त्याआधीच नागपूर जवळच्या पाचगावपासून 2 किमी अंतरावर नागपूर - कुही मार्गावर दोघांची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकल्याची घटना समोर आली आहे.

आज सकाळी रस्त्यावरून येणाऱ्यांना रस्त्याच्या कडेला दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोघांना धारदार शस्त्राने मारल्याचे समोर आले आहे. दोघांची ओळख पटली असून त्यांची नावे कृणाल ठाकरे आणि सुशील बावणे अशी आहेत.

गँगवारमधून हत्याकांडाची शक्यता -

घटनास्थळी भांडणाची, झटापटीची कोणत्याही खुणा नसल्याने दोघांची इतरत्र हत्या करून पाचगाव जवळ आणून फेकल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दोघेही नागपूरच्या कुख्यात ठवकर टोळीचे हस्तक असून हे गुन्हेगारांमधील गँगवारचा प्रकार असण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे काल कपिल नगर पोलीस ठाण्याच्या उप्पलवाडी परिसरात एका वृद्ध चौकीदाराची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेचे आरोपी अजून पकडले गेले नसताना आता गँगवारमध्ये हे दुहेरी हत्याकांड झाले आहे.

गेल्या आठवड्यातही हिंगणा, एमआयडीसी आणि प्रतापनगर परिसरात हत्येच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे नागपुरात दिवाळीच्या काळात ही गुन्हेगारी थांबलेली नसून उलट गँगवार उफाळून आल्याने दिवाळी रक्तरंजित झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.