नागपूर - नागपूर कारागृहात कैदेत असणाऱ्या डॉन अरुण गवळी यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यासह इतर चार कैदीही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे कारागृहात नवीन कोरोनाचा शिरकाव तर झाला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात अरुण गवळीवर वेगळ्या सेलमध्ये तसेच इतर रुग्णावर उपचार सुरू आहेत.
गवळीसह अन्य चार लोकांना कोरोनाची लागण-
सर्वत्र कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कारागृहातील कैदी कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. कारागृह मागील वर्षी दोन तीन महिन्यात कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असतांना जवळपास 600 च्या घरात रुग्ण आढळले होते. यात कारागृह प्रशासन आणि डॉक्टरांच्या चमूने यावर अथक परिश्रम आणि प्रयत्न करत नियंत्रण मिळवले होते. यात आज डॉन अरुण गवळी यांच्यासह अन्य चार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.
कोरोनाची लागन नेमकी कोणापासून आणि कशी झाली-
अरुण गवळी यांना अंडा सेलमध्ये ठेवले आहे. यात अंडा सेलमध्ये त्याच्यावर देखरेख ठेवणारे किंवा जेवण देणारे, असे मोजक्याचा लोकांचा संपर्क त्यांच्याशी येत असतो. यामुळे कोरोनाची लागन नेमकी कोणापासून आणि कशी झाली असाही प्रश्न आहे. यात कोरोनाच्या अनुषंगाने त्रीसूत्रीचे पालन करण्याची गरज नक्कीच पुढे येत आहे. सध्या डॉन गवळी तसेच कुख्यात आरोपी शेखुलाजी यांना उपचार करण्यासाठी वेगेळे ठेवले आहे.
हेही वाचा- ..त्यामुळे शिवसेनेला पंतप्रधानपद मिळाल्यासारखे वाटतंय, फडणवीसांचा शिवसेनेला टोला