ETV Bharat / city

महानगरालगतच्या शहरांना हॉटस्पॉट होऊ देऊ नका; जिल्हाधिकांऱ्याचे आवाहन

महानगर लगतच्या शहरांना हॉटस्पॉट होऊ न देण्याचे, तसेच काळजी घेण्याचे आवाहन जिल्ल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच त्यांनी कामठी नगरपरिषदेचा व मान्सूनपूर्व कामाचाही आढावा घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन
जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन
author img

By

Published : Jun 11, 2021, 12:15 PM IST

Updated : Jun 11, 2021, 2:06 PM IST

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्युदर कमी होत आहे. एकीकडे आनंदाची बाब असली तरी दुसरीकडे रस्त्यावरची गर्दी पुन्हा चिंता वाढविणारी आहे. यामुळे महानगरलगतच्या शहरातील नगरपालिकांनी सावध राहत प्रतिबंधात्मक उपाय कायम ठेवण्याची गरज आहे, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे कामठी बैठकी दरम्यान म्हणाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कामठी नगरपरिषदेला गुरुवारी भेट दिली होती, तेव्हा ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नगर परिषद अध्यक्ष मोहमंद शहाँजहाँ सफाद अन्सारी त्यांच्यासोबत होते.

कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नागपूर महानगरांमध्ये विविध खासगी आस्थापनावर काम करणारे कामगार आणि मजूर हे शहराच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे आहे. याशिवाय ढाबे, हॉटेल्स, रेस्टॉरंट याठिकाणी काम करणारा वर्गही आसपासच्या परिसरात राहतो. या सर्वांचा मोठ्या प्रमाणात अनेकांशी संपर्क येतो. मंगल कार्यालय, ढाबा, रेस्टॉरंट याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. ज्यांना लक्षणे दिसत आहेत, त्यांनी काळजी म्हणून कामावर जाण्यास टाळावे. तसेच तपासणी करून घ्यावी. त्रिसूत्रीचे पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी वेळोवेळी निर्जंतुकीकरण करून घ्यावे, प्रतिबंधात्मक उपाय करावे, असे सांगितले जात आहे.

'अनलॉकनंतरची गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी'

"कामठी शहरात रुग्ण संख्या घटली आहे. परंतु अनलॉकनंतरची गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी आहे. यासाठी प्रशासनासोबत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी लसीकरण मोहिमेत मदत करावी, जेणेकरुन प्रत्येकाचे लसीकरण होईल", असेही ते म्हणाले. तसेच याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ठाकरे यांनी केले आहे.

मान्सूनपूर्व तयारीचा घेतला आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी कामठी शहरातील मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी, हिंगणा, वानाडोंगरी, वाडी, सावनेर, खापा, मोहपा, कळमेश्वर, उमरेड, भिवापूर, कुही आदी नगरपरिषद आणि नगर पंचायतीला भेटी दिल्या आहेत. या आठवड्यात अन्य जिल्ह्यातील नगरपालिकांना देखील लवकरच भेटी देऊन आढावा घेणार आहे.

हेही वाचा - नागपुरात धोकादायक इमराती दीडशे पार, महापालिकेने बजावली नोटीस

Last Updated : Jun 11, 2021, 2:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.