ETV Bharat / city

शासकीय आढावा बैठकीत काँग्रेस, भाजपामध्ये खडाजंगी; व्हिडिओ व्हायरल - नागपूर जिल्हा लेटेस्ट न्यूज

राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर यांच्यात खडाजंगी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बैठकीत बोलावून अपमानित केल्याचा आरोप यावेळी आमदार टेकचंद सावरकर यांनी केला आहे.

शासकीय आढावा बैठकीत काँग्रेस, भाजपामध्ये खडाजंगी

author img

By

Published : Jun 14, 2021, 6:32 PM IST

नागपूर - राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर यांच्यात खडाजंगी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बैठकीत बोलावून अपमानित केल्याचा आरोप यावेळी आमदार टेकचंद सावरकर यांनी केला आहे.

राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज कामठी तालुक्याच्या सर्व शासकीय विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत कामठी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार टेकचंद सावरकर यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. मात्र बैठकीत आमदार उशिरा पोहोचल्याने त्यांची व्यासपीठावर एका कोपऱ्यात बसण्याची व्यवस्था करण्यात आली. यावरून आमदार सावरकर यांनी संताप व्यक्त केला. तसेच सावरकर यांना बोलण्याची संधी देखील देण्यात आली नाही. त्यामुळे आमदार टेकचंद सावरकर यांचा संताप आणखीच वाढला. व्यासपीठावर केवळ काँग्रेसचेच पदाधिकारी दिसत असल्याने ही शासकीय आढावा बैठक आहे की, काँग्रेसचा मेळावा असा सवाल सावरकर यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान अचानक वातावरण तापल्याने काँग्रेसचे आणि भाजपाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. मात्र वेळीच आयोजकांनी प्रसंगावधान राखत दोन्ही गटाला शांत केल्याने पुढील वाद टळला. त्यानंतर बैठकीचा निषेध करत, सावरकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी बैठकीतून निघून गेले. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

शासकीय आढावा बैठकीत काँग्रेस, भाजपामध्ये खडाजंगी

मंत्र्यांनी आपमान केला - सावरकर

कामठी विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने मी बैठकीला उपस्थिती राहिलो. परंतु बैठकीला गेल्यावर बैठक शासकीय विभागाची होती की काँग्रेसचा मेळावा असा पहिला प्रश्न माझ्या मनात आला. शिष्टाचारानुसार आमदाराला व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही. तसेच कोणत्याही शासकीय व संवैधानिक पदावर नसलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना व्यासपीठावर मुख्य स्थानी बसवण्यात आले होते. एवढंच नाही तर बैठकीत बोलण्याची संधी देखील मला दिली नाही असा आरोप सावरकर यांनी केला आहे.

हेही वाचा - कॉंग्रेस हायकमांडने जबाबदारी दिली, तर मुख्यमंत्रीही होईन - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.