ETV Bharat / city

मृतावस्थेतील धाम नदीला मिळाले पुनर्जीवन; सीएसआरसह सामूहिक प्रयत्नांची जोड - उद्योगपती राहुल बजाज

बजाज फाऊंडेशनच्या मदतीने प्राथमिक टप्यात केवळ चार कोटी रुपये खर्च करून सुमारे सहा किलोमीटर नदीतील गाळ काढून खोलीकरण आणि सोंदर्यीकरण करण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन वर्षात २६ किलोमीटर नदीच्या पात्राचे खोलीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील २६ किलोमीटरपैकी सहा किलोमीटरच्या पट्ट्यात काम पूर्ण झाले आहे.

Dham river
Dham river
author img

By

Published : Oct 19, 2021, 7:43 PM IST

Updated : Oct 19, 2021, 8:29 PM IST

नागपूर/वर्धा- वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली धाम नदी गेल्या वर्षी मृतावस्थेत पोहचली होती. दिलासादायक बाब म्हणजे सामूहिक प्रयत्न आणि सामाजिक जाणिवेतून या धाम नदीला पुनर्जीवन प्राप्त झाले आहे. एक छोटासा प्रयत्न किती सकारात्मक बदल घडवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे धाम नदी प्रकल्प आहे.

आर्वी तालुक्यातील शेकडो गावांची आणि संपूर्ण वर्धा शहराची तहान भागावणारी धाम नदीला जलवाहिनीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बजाज फाऊंडेशनच्या मदतीने प्राथमिक टप्यात केवळ चार कोटी रुपये खर्च करून सुमारे सहा किलोमीटर नदीतील गाळ काढून खोलीकरण आणि सोंदर्यीकरण करण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन वर्षात २६ किलोमीटर नदीच्या पात्राचे खोलीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील २६ किलोमीटरपैकी सहा किलोमीटरच्या पट्ट्यात काम पूर्ण झाले आहे. शेकडो टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे भूजल साठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.

मृतावस्थेतील धाम नदीला मिळाले पुनर्जीवन

हेही वाचा-स्वाभिमानीची ऊस परिषद : राजू शेट्टी नेमकी काय मागणी करणार याकडे सर्वांचे लक्ष..

वर्धा शहरापासून १५ किलोमीटर असलेल्या येळाकेळी या गावातून कधीकाळी तुडुंब भरून वाहणारी धाम नदी शेवटच्या घटका मोजत होती. धाम नदीला कधीकाळी वर्धा जिल्ह्याचे वैभव म्हणून ओळख मिळाली होती. मात्र हळूहळू नदीत मातीचा भराव पडल्याने नदीचे पात्र संकुचित होत गेले. नदीतील गाळ कधीही काढलाच गेला नसल्याने धाम नदी मृत पावली होती.

उद्योगपती राहुल बजाज यांनी घेतला पुढाकार-

धाम नदीला वाचविण्यासाठी अनेक जलतज्ज्ञांनी प्रयत्न केले. मात्र, त्याचा फार उपयोग होत नसल्याने या संदर्भात काही जलतज्ज्ञांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संपर्क साधून धाम नदीला पुनर्जीवित करण्याची विनंती केली. यावर गडकरी यांनी उद्योगपती राहुल बजाज यांना पत्र लिहिले. कंपनीच्या सीएसआर निधीतून धाम नदीला पुनर्जीवित करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. उद्योगपती राहुल बजाज यांनीदेखील नितीन गडकरी यांच्या विनंतीला मान देऊन तात्काळ चार कोटी उपलब्ध करून दिले. त्या प्रयत्नातून सहा किलोमीटर नदीचे पात्र जलमय झाले आहे.

हेही वाचा-..म्हणून नितीन गडकरींचे नाव मृत्यूपत्रात दिले, माजी मंत्री दत्ता मेघेंनी केला खुलासा

धाम नदीचा इतिहास-

धाम नदी ही गोदावरी खोऱ्यातील वर्धा उपखोऱ्यामध्ये येत आहे. ही वेणा नदीची उपनदी आहे. धाम नदीचे मूळ सातपुडा पर्वतामधील जोगामध्ये आहे. धाम नदी उत्तर पूर्व ते दक्षिण पश्चिम अशी वाहते. पुढे ती हिंगणघाटच्या खुनी या गावाजवळ वेणा नदीला जाऊन मिळते. धाम नदी वर्धा जिल्ह्यातील आर्वी मार्गावरील खरांगणा-मोरांगणा या गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या महाकाळी गावाजवळ १९८६ साली धाम मध्यम प्रकल्पाचे मातीचे धरण बांधण्यात आले होते. या प्रकल्पाच्या खालील भागात २६ किलोमीटर अंतरावर धाम-उन्नई बंधारा बांधण्यात आला आहे.

हेही वाचा-Gangster Suresh Pujari : कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटक; सूत्रांची माहिती

Last Updated : Oct 19, 2021, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.