नागपूर - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून मुंबई ही हिंदुत्वाची आहे. असे विधान केले होते. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत उत्तर देत म्हणाले कि, शिवसेनेचं हिंदुत्व आणि भगवा हे भेसळयुक्त झालयं. ते अशा लोकांसोबत सत्तेत बसलेत जे सावरकरांना रोज शिव्या घालतात. त्यामुळे शिवसेना ही आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही, अशी खरमरीत टीका फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस सध्या पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आहेत. राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात सध्या चांगलेच शाब्दिक युध्द सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका -
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या त्या विधानावर फडणवीसांनी जोरदार टीका केली आहे. ज्या हिंदूत्वा बद्दल हे बोलत आहे. ते हिंदूत्व आता राहिले नाही. भगव्याच्या गोष्टी यांनी करू नये. कारण भगवा आता भेसळयुक्त झाला आहे. राज्यात ज्या लोकांसोबत तुम्ही सत्तेत बसला आहात. तेच लोक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत पुस्तके लिहित आहेत. तुम्ही त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसताय आणि कसल्या हिंदूत्वाच्या गोष्टी करताय. अशी टिकाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
ऊर्जा विभागावरिल चौकशी अत्यंत हास्यास्पद -
शिवाय ज्या काँग्रेसचा गुपकरांसोबत राहून चीनच्या मदतीने आम्ही काश्मीरमधे ३७० लागू करू, असा अजेंडा आहेत. त्यांच्या सोबत बसताय आणि भगव्याच्या गोष्टी करताय. हा काँग्रेस भगवा आहे. असे फडणवीस म्हणाले. सोबतच वीज बिलाच्या मुद्यावर बोलतांना ऊर्जा विभागावरिल चौकशी ही अत्यंत हास्यास्पद आहे. त्यामुळे खुशाल चौकशी करा. आणि चौकशी केलीही तरी जी थकबाकी आहे ती कॉग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या काळातील आहे. ही चौकशी त्यांची होईल. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच बावनकुळे यांच्या काळात वीज विभागाच काम उत्तम झालयं. एवढेच काय तर सगळ्यात कमी दरात आमच्या काळात वीज खरेदी केली आहे. त्यामुळे हिंमत असेल तर ही चौकशी करा. आम्ही गरिब आणि शेतकऱ्यांना सवलत दिली. त्यामुळे तुम्हीही हिंमत दाखवा. असे आव्हानही यावेळी फडणवीस यांनी केले आहे. शिवाय या सरकार मध्ये काँग्रेस हे बिन बुलाय मेहमान आहे. यांना महत्व उरले नाही. असा चिमटाही यावेळी फडणवीसांनी काढला.