ETV Bharat / city

Devendra Fadnavis Met Mohan Bhagwat : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी पहिल्यांदाच सरसंघचालकांची घेतली भेट - सरसंघचालक मोहन भागवत

महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनानंतर भाजप पुरस्कृत शिंदे गटाचे सरकार आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री ( Deputy CM Devendra Fadnavis ) म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस काल कामानिमित्त नागपूरला आले होते. त्यांनी सरकार स्थापन झाल्यापासून प्रथमच संघ कार्यालयास भेट दिली. तेथे मोहन भागवत ( Sarsangchalak Mohan Bhagwat ) यांची भेट ( Devendra Fadnavis Met Mohan Bhagwat ) घेऊन चर्चासुद्धा केली. देवेंद्र फडणवीस गुरुपौर्णिमेला येऊ न शकल्याने कदाचित आता भेट दिल्याचे बोलले जात आहे.

Deputy CM Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 19, 2022, 7:19 AM IST

Updated : Jul 19, 2022, 7:59 AM IST

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता बदल झाल्यानंंतर ( After the change of power ) भाजप पुरस्कृत शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार सांभाळला आहे. नवीन सरकारच्या कामकाजाला सुरुवातसुद्धा झाली. नवीन सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार अजून बाकी आहे. तरी काल देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) हे कामानिमित्त नागपूरला आले ( Devendra Fadnavis come to Nagpur ) होते. त्यांनी नागपूर विमानतळावर आल्यानंतर प्रथमच भाजपचे मातृस्थान ( Sangh Headquarters, Motherland of BJP )असलेल्या संघ मुख्यालयास ( Sarsangchalak Mohan Bhagwat ) भेट दिली.

संघ मुख्यालयास भेट : देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरला आले. यावेळी विमानतळावर आल्यानंतर थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. संघ मुख्यालयात ते बरोबर 9 वाजता आले होते. तब्बल 45 मिनिटे त्यांनी सरसंघचाल यांची भेट घेतली. यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते नागपुरात येऊ न शकल्याने आज त्यांनी सरसंघचालक यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. तसेच, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच संघ कार्यालयात भेट घेत अनेक विषयांवर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. यात नेमकी चर्चा काय झाली असावी, यावर मात्र तर्कवितर्क व्यक्त लावला जात आहे.

संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते : देवेंद्र फडणवीस हे संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. त्यांनी स्वतः याचा अनेक वेळा उल्लेख केला आहे. त्यांनी याबद्दल अनेक ठिकाणी गौरवोद्गार काढले आहेत. संघाच्या शिस्तीने मी येथपर्यंत आलो आहे. असे ते नेहमी म्हणत असतात. संघ कार्यकर्ता ते संघ प्रचारक असा त्यांचा संघातील प्रवास राहिला आहे. संघा कार्यकर्ता म्हणून त्यांनी बरेच वर्षे काम केल्यामुळे त्यांना कार्यकर्ता म्हणून कामाचा चांगाला अनुभव आहे. मागील बरेच दिवस देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयाला भेट दिली नव्हती. गुरुपौर्णिमेला त्यांना येत आले नसेल, त्यामुळे कदाचित त्यांनी काल नागपुरात आल्यावर विमानतळावर आल्यानंतर थेट संघ मुख्यालय गाठले.

नागपुरात नगरसेवक म्हणून सुरुवात : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशित तयार झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता म्हणून कामास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये नगरसेवक ते महापौर ही पदे मिळवली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाजपचा तिकिटावर प्रवेश मिळवला आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केले. आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत मजल मारली. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क आला आणि त्यानंतर मोदी यांनी गडकरी आणि मुंडे यांच्यातील दुवा म्हणून फडणवीस यांचा वापर केला. या संधीचे फडणवीस यांनी सोनं केले.

2014 मध्ये मुख्यमंत्री पदाची घेतली होती शपथ : 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला संख्याबळ सर्वाधिक मिळाल्याने मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली ती पक्षातील दिग्गज नेत्यांना बाजूला सारून. फडणवीस यांच्या नेतृत्वाला पक्षातून काही प्रमाणात आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यासारख्या नेत्यांना त्यांनी पक्षात राहूनच प्रभावहीन करून टाकले. पक्षांतर्गत विरोधक संपवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजकीयदृष्ट्या स्वतःचे महत्त्व वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

हेही वाचा : Heavy Rain in Chandrapur Wardha : संततधार पावसामुळे चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

Last Updated : Jul 19, 2022, 7:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.