नागपूर - किटकनाशकाचे औषध पोटात गेल्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना येथील कपिल नगर येथे घडली आहे. रिहान मुन्ना अजय पाटील असे मृत्यू झालेल्या मुलाचे आहे. घरात शिरलेल्या मांजराने कपाटावर ठेवलेला किटकनाशकाच्या औषधाचा डब्बा खाली पाडला. त्यातील औषध जमीनीवर सांडले होते. त्यावेळी रिहानच्या अंगाला ते औषध लागले होते. त्याचवेळी औषधाने माखलेले हात रिहानने तोंडात घातल्याने ते औषध त्याच्या तोंडात गेले. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मुलाच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी तो डब्बा कपाटावर ठेवला
कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलका कॉलनीत अजय पाटील राहतात. ते व्यवसायाने शेती करतात. काही दिवसांपूर्वी अजय पाटील यांनी शेतात फवारणी करण्यासाठी किटकनाशकाची एक बाटली घरी आणली होती. मुलाच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी तो डब्बा कपाटावर ठेवला. सोमवारी दुपारी ते घराबाहेर होते. तर, त्यांची पत्नी घरकामात व्यस्त असताना एका मांजराने तो डब्बा खाली पडला. त्यावेळी दीड वर्षांचा त्यांचा रियांश ऊर्फ मुन्ना हा घरातच खेळत होता. खेळता-खेळता रियांशचा जमिनीवर पडलेल्या त्या द्रव्याला स्पर्श झाला. त्याचे संपूर्ण शरीर त्या द्रव्याने माखले होते. नकळत हाताला लागलेले औषध रियांशच्या तोंडा वाटे पोटात गेले. तो पर्यंत ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही.
रियांशच्या आईने घातली अंघोळ
रियांशची आई जेव्हा घरात आल्या, तेव्हा त्यांनी रियांशचे हात-पाय स्वच्छ धुतले नंतर आंघोळही घालून दिली. तोपर्यंत ते विषारी औषध त्याच्या पोटात गेले असेल याची कुणाला साधी कल्पना नव्हती. काही वेळानंतर रियांशची प्रकृती बिघडल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तब्येत खालावत असल्याने डॉक्टरांच्या सल्याने रियांशला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा - सीडीएस बिपीन रावत यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण ; पाहा फोटोंच्या माध्यमातून