ETV Bharat / city

हॉटेलमध्ये सापडला कामगाराचा मृतदेह; सोबतचे दोघे बेपत्ता असल्याने गूढ कायम - nagpur crime news

शहरातील सीताबर्डी परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये एका तरुण कर्मचाऱ्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्यासोबत काम करणारे दोघेही बेपत्ता आहेत. त्यामुळे या तरुणाच्या मृत्यूबद्दलचे गूढ वाढले आहे.

nagpur crime
शहरातील सीताबर्डी परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये एका तरुण कर्मचाऱ्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे.
author img

By

Published : May 15, 2020, 3:13 PM IST

नागपूर - शहरातील सीताबर्डी परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये एका तरुण कर्मचाऱ्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्यासोबत काम करणारे दोघेही बेपत्ता आहेत. त्यामुळे या तरुणाच्या मृत्यूबद्दलचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे.

सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोखंडी पुलाजवळ जसपाल सिंग यांच्या मालकीचे खालसा हॉटेल आहे. या ठिकाणी तीन तरुण कामाला होते. रात्री उशिरा हॉटेलमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती समजताच सीताबर्डी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यानंतर हॉटेल मालक सिंग यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी हॉटेल उघडून आत प्रवेश केल्यानंतर संबंधित तरुण मृतावस्थेत आढळून आला.

शहरातील सीताबर्डी परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये एका तरुण कर्मचाऱ्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे.

लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून हॉटेल बंद आहे. मात्र, त्यामध्ये काम करणारे तिघे याच ठिकाणी वास्तव्यास होते. तीन कर्मचाऱ्यांपैकी मृतदेह कुणाचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.