ETV Bharat / city

सोशल मीडियावर कोणीतरी तुमच्या नावाचे फेक अकाऊंट तर तयार केले नाही ना?

सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. यामुळे जास्त फॅन फॉलोविंग असणाऱ्या व्यक्तीच्या नावे फेसबुक या सोशल साईटवर बनावट अकाऊंट बनवून 'एस्कॉर्ट सर्व्हिस'ची जाहिरात केली जात आहे. ज्यामध्ये सेक्स रॅकेट सुद्धा चालावले जात असल्याची शंका पॉलिसांकडून व्यक्त होत आहे. नागपुरात उघडकीस आलेल्या प्रकरणात या तीन व्यक्तीमध्ये एक जण नामांकित कंपनीत आहे, एक सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत तर तिसरे हे सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे. या तिघांच्या नावाने उघडलेल्या बनावट अकाऊंटवर आक्षेपार्ह मजुकर असल्याचे त्यांना ओळखीच्या लोकांनी कळवले, तेव्हा तिघांनाही धक्का बसला आणि त्यांनी सायबर पोलिसात धाव घेतली.

सोशल मीडिया
सोशल मीडिया
author img

By

Published : Jun 29, 2021, 6:54 AM IST

नागपूर - शहरात बनावट फेसबुक अकाऊंट बनवून प्रतिष्ठित व्यक्तींना मनस्ताप देण्याच्या नवीनच प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. यात नागपुरातील तीन प्रतिष्ठित व्यक्तिंच्या बाबतीत हा प्रकार मागील महिन्याभरात घडल्याचे पुढे आले आहे. यात नागपूरच्या सायबर पोलिसांनी तक्रारी नोंदवून घेत तपास सुरू केला आहे. यामुळे सोशल मीडियाचा वापरत करतांना सावधानता बाळगण्याची गरज आहे. यात तक्रारीची संख्या कमी वाटत असली तरी बदनामीमुळे अनेक जण पुढे येत नसल्याचे बोलले जात आहे.

सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. यामुळे जास्त फॅन फॉलोविंग असणाऱ्या व्यक्तीच्या नावे फेसबुक या सोशल साईटवर बनावट अकाऊंट बनवून 'एस्कॉर्ट सर्व्हिस'ची जाहिरात केली जात आहे. ज्यामध्ये सेक्स रॅकेट सुद्धा चालावले जात असल्याची शंका पॉलिसांकडून व्यक्त होत आहे. नागपुरात उघडकीस आलेल्या प्रकरणात या तीन व्यक्तीमध्ये एक जण नामांकित कंपनीत आहे, एक सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत तर तिसरे हे सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे. या तिघांच्या नावाने उघडलेल्या बनावट अकाऊंटवर आक्षेपार्ह मजुकर असल्याचे त्यांना ओळखीच्या लोकांनी कळवले, तेव्हा तिघांनाही धक्का बसला आणि त्यांनी सायबर पोलिसात धाव घेतली.

सोशल मीडियावर कोणीतरी तुमच्या नावाचे फेक अकाऊंट तर तयार केले नाही ना?..

सायबर गुन्हेगार या नवीन पद्धतीने लोकांना जाळ्यात ओढण्याचे काम करत आहे. प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाचे फेक अकाऊंटवर जिगेलो, एसकॉर्ट सर्व्हिस देण्यासाठी हायप्रोफाईल व्यक्तीच्या फोटो वेगळे आणि धड वेगळे वापरून फोटो एडिट केले जातात. त्यानंतर त्यावर मोबाईल नंबर देऊन फोन करायला लावतात. मग यात आंबट शौकीनाना फोनवर गुंतवले जातात. पैशे दिले तर एसकॉर्ट सर्व्हिसच्या नावावर वाटेल ते पुरवण्याचे आमिष देत त्यांना जाळ्यात ओढले जाते. या तिन्ही तक्रारीच्या बाबतीत फेक आयडीचा वापर कसा झाला याचा शोध सध्या सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

तरुण तरुणीना पैशाचे आमिष..

यात सेक्स रॅकेट चालवण्यासाठी तरुण तरुणींना पैशाचे आमिष दिले जाते. अनेकदा पैशांची गरज असणाऱ्यांना अशा जाहिरात टाकून जाळ्यात ओढले जातात. काही जण मजबुरीने तर काही झटपट पैशे कमावण्याच्या नादात यात अडकतात. जिगेलो सर्व्हिस असो की एस्कॉर्ट सर्व्हिस देण्यासाठी तरुण तरुणीना काही रक्कम देऊन हा व्यवसाय चालवला जात असल्याचे बोलले जात आहे.

सोशल माध्यमांचा उपयोग करतांना सावधान..

लॉकडाऊनच्या काळात सोशल माध्यमांचा वापर वाढलेला आहे. यामुळे सायबर गुन्हेगारांच्या मोडसमध्ये बदल झाला आहे. बँकेतून बोलतो असे सांगत ओटीपी मागणे, नौकरीसाठी आमिष, पार्सलसाठी पैसे आले, आंबट शौकीनाना ऑनलाइन व्हिडिओ कॉल करून महिलांशी बोलणे, असे प्रकार आपण पाहिले आहे. यात नव्याने आता सेक्सटॉर्शन सारखे प्रकार पुढे येत असताना एखाद्याच्या नावाचे दुसरेच फेसबुक अकाऊंट वापरत लोकांची फसवणूक केली जात आहेत. त्यामुळे सोशल माध्यमे वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे.

अकाऊंट डिलिट करून होणार नाही, सायबर पोलिसांत तक्रार करा..

अनेकांसोबत असे प्रकार घडले की स्वतःचे अकाऊंट डिलिट करून मोकळे होतात. पण बनावट फेसबुक अकाऊंट कायम राहते. यामुळे सायबर पोलिसांना तक्रार करण्याची गरज आहे. जेणेकरून तुमच्या नावाचा वापर करणं थांबवलं जाऊ शकेल. यामुळे बदनामी होण्याची भीती न बाळगता यात सायबर पोलीसांची मदत घ्यावी. यासोबत स्वतःच्या मोबाईलच्या मध्यातून काही ठिकाणी प्रायव्हसी सेटिंग करून, तसेच स्वतः विषयी महत्वपूर्ण माहिती पब्लिक न करता हाईड करून ठेवावी जेणेकरून काही प्रमाणात का होईना याला आळा घालता येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.