नागपूर - नागपूरच्या महाराज बागेतील नाल्यातील मगरीला रेस्क्यू करण्यात कोल्हापूरच्या पथकाला (Crocodile Rescued by kolhapur Environmentalists group) यश मिळाले आहे. यात वनविभागाच्या पिंजरा लावलेल्या मोहिमेला फारसे यश मिळाले नाही.
हेही वाचा - Nagpur Corona : उपराजधानीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी विशेष तयारी, जाणून घ्या..
नाग नदी परिसरातील ही मगर मागील दोन महिन्यांपासून कित्येकजणांना दिसत होती. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाकडूनही पिंजरा लावून रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला, पण मगर चपळ असल्याने पिंजऱ्यात पकडण्याची मोहीम यशस्वी झाली नाही.
कोल्हापुरातील चमू शनिवारी नागपुरात दाखल झाले होते. त्यांनी मगर असलेल्या भागात जाऊन पाहणी केली. त्यानंतर नागपूरच्या वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक केली. या बैठकीनंतर रात्री 8 वाजतापासून कामाला सुरूवात केली. मध्यरात्री 2 ते अडिच वाजताच्या सुमारास चमूला मगरीला पकडण्यात यश आले.
कोल्हापूरच्या पथकाने मगरीला रेस्क्यू केल्यानंतर तिला नागपूरच्या ट्रान्झिट सेंटरला नेण्यात आले. मादा मगरीची वैदकीय तपासणी करण्यात आली. सर्व काही ठीक असल्यानंतर वन विभागाच्या वतीने 'elusive -5' या मगरीला पशुवैद्यकांच्या निरीक्षणाखाली फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले. वन विभागाच्या चमूने मगरीला तोतलाडोह येथे नेल्याची माहिती सुरेंद्र काळे यांनी दिली.
मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार आणि मा. उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सहाय्यक वनसंरक्षक सुरेंद्र काळे, लवनपरिक्षेत्र अधिकारी विजयकुमार गंगावणे, आणि सारीका वैरागडे, कोल्हापूर वन्यजीव संक्रमण केंद्राचे वैदकीय तज्ज्ञ डॉ. संतोष वाळवेकर, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते, नागपूर व कोल्हापूर वनविभागातील रेस्क्यू पथक आणि सेमिनरी हिल्स, नागपूर येथील कर्मचारी तसेच, वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटीच्या चमूने या कार्यासाठी मोलाचे योगदान दिला.
हेही वाचा - समिर वानखेडेंचा कार्यकाळ संपूनही पदमुक्ततेची सूचना नाही; 2 वर्षांत केली 'ही' कामगिरी