ETV Bharat / city

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आजपासून निर्बंध; जाणून घ्या काय सुरू, काय बंद?

author img

By

Published : Jan 10, 2022, 3:26 PM IST

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर अंकुश लावण्यासाठी राज्यशासनाने निर्बंध लागू केले आहेत. नागपूर जिल्ह्यातही आज (सोमवार) रात्रीपासून निर्बंध ( covid 19 restriction in nagpur ) लागू करण्यात आले आहेत. यात सकाळी जमावबंदी असणार असून रात्रीपासून पहाटे पर्यंत अत्यावश्यक कामशिवाय बाहेर फिरण्याची मनाई असणार आहे.

covid 19 restriction in nagpur
सलून

नागपूर - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर अंकुश लावण्यासाठी राज्यशासनाने निर्बंध लागू केले आहेत. नागपूर जिल्ह्यातही आज (सोमवार) रात्रीपासून निर्बंध ( covid 19 restriction in nagpur ) लागू करण्यात आले आहेत. यात सकाळी जमावबंदी असणार असून रात्रीपासून पहाटे पर्यंत अत्यावश्यक कामशिवाय बाहेर फिरण्याची मनाई असणार आहे. यात मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी आदेश काढत निर्बध लागू केले आहेत.

हेही वाचा - Arrested with Gold Biscuits : नागपूर रेल्वे स्थानकातून सोन्याच्या बिस्कीटासह एकाला अटक

'या' वेळेत राहणार जमावबंदी आणि संचारबंदी

नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढली असताना नवीन व्हेरीएंट ओमायक्रॉन बाधितांचे रुग्ण मिळून येत आहेत. त्यामुळे नागपूर शहरात आज संध्याकाळपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात सकाळी 5 ते संध्याकाळी 11 पर्यंत जमावबंदी असणार असून, रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी असणार आहे. अत्यावश्यक कामशिवाय बाहेर पडू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे.

'ही' आस्थापने 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील

  • Gyms, salons resume business at 50% capacity in Nagpur after Maharashtra govt issued revised guidelines. "We are following COVID -appropriate behaviour and taking necessary precautions. People allowed in adherence to guidelines," says a gym trainer pic.twitter.com/jyHSIk9z5O

    — ANI (@ANI) January 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

निर्बंधामध्ये हॉटेल, रेस्टॉरेंट, मल्टिप्लेक्स, मॉल, चित्रपट गृह, सलून हे केवळ 50 टक्के क्षमतेने कोविड नियमांचे पालन करून सुरू ठेवता येईल. स्विमिंगपूल आणि वेलनेस सेंटर मात्र बंद ठेवावे लागणार आहे.

शासकीय कार्यलयात 'हा' नियम पाळावा लागेल

शासकीय कार्यालयात नागरिकांना कार्यालय प्रमुखाच्या परवानगीशिवाय प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अधिकारी यांनी शासकीय कामे अधिकाधिक ऑनलाईन पद्धतीने करावी, अशी सूचना देण्यात आलेली आहे. कार्यालयाच्या वेळेत बदल करून वर्क फ्रॉमचा वापर करावा, असेही सूचित करण्यात आले आहे. तसेच, शासकीय कार्यालयात प्रवेश घेताना थर्मल स्कॅनर, सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून कोविड - 19 नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही सांगण्यात आलेले आहे.

15 फ्रेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद

शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस हे सुद्धा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचे आदेश नव्याने देण्यात आलेले आहे.

मंगल कार्यालयासाठी 'हा' नियम

मंगल कार्यालय किंवा विवाह स्थळी केवळ 50 लोकांमध्ये विवाह साजरा करावा, अन्यथा त्यापेक्षा अधिक लोक असल्यास 50 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल, असे निर्देश दिले आहे. त्यासोबतच गुन्हा सुद्धा दाखल केला जाणार आहे. अंत्यविधीसाठी सुद्धा 20 लोकांपेक्षा अधिक लोक असू नये, असे सांगण्यात आले आहे.

ही पर्यटन स्थळे बंद

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानातील सफरीसह विदर्भातील व्याघ्र प्रकल्प आणि उद्याने हे पर्यटनासाठी बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेला आहे.

हेही वाचा - नागपूर : वर्षभरापूर्वी अपघातात जखमी झाला होता रानबोक्या, यशस्वी उपचारानंतर जंगलात सोडले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.