ETV Bharat / city

गडकरींनी पत्र कुणाच्या दबावात तर लिहिले नाही ना? नाना पटोले यांचा सवाल

author img

By

Published : Aug 15, 2021, 2:13 AM IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र हे दाढीवाले बाबा यांच्या दबावाखाली लिहले का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला. ते नागपुरात 'व्यर्थ न जाये बलिदान' या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

patole comment on gadkari lette
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र हे दाढीवाले बाबा यांच्या दबावाखाली लिहले का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला. ते नागपुरात 'व्यर्थ न जाये बलिदान' या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

हेही वाचा - शिवसेनेला टिकायचं असेल तर भाजपची युती हाच पर्याय - रामदास आठवले

पंचवीस वर्षे भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे युतीमध्ये राहिली. शिवसेना कशी वागते, हे त्यांना माहीत नाही का? तेव्हा मात्र गडकरी यांनी कधीही शिवसेनेच्या कामासंदर्भात किंवा शिवसेनेच्या वागणुकीबद्दल असे वक्तव्य केले नाही, किंवा असे पत्र लिहावे लागले नाही, असे म्हणत आता मात्र हे पत्र कोणाच्या तरी दबावाखाली लिहिल्याचे दिसत आहे. हे पत्र केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दाढीवाले बाबा यांच्या दबावाखाली लिहिले का? असा सवाल पटोले यांनी केला.

देशात महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधले जात आहे. रस्ते प्रकल्पांच्या किमती वाढल्या आहेत. यापद्धतीचा तक्रारीचा पत्रव्यवहार अनेक लोकांनी केला आहे. याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे नाना पटोले म्हणाले. केंद्रीय मंत्री या मुद्द्यावर एखादी श्वेतपत्रिका काढणार का? असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला.

लोकांच्या भीतीमुळे ट्विटर अकाऊंट सुरू झाले

देशातील जनतेचे प्रश्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लावून धरले. मग शेतकरी विरोधी कायदा असो की, बेरोजगारांचे प्रश्न असो, त्यांचा आवाज राहुल गांधी बनले आणि लोकांचा पाठिंबा काँग्रेसला मिळताना दिसल्याने घाबरून त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याचे पाप मोदी सरकारने केले. पण, अखेर भीतीने जनतेच्या एकतेच्या प्रतिकामुळे बंद अकाउंट पुन्हा चालू करावे लागले, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

व्यर्थ न जाये बलिदान याने ज्योत पेटवली आहे. मोठा युवावर्ग या कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेससोबत जुडला आहे. पुढचा काळ काँग्रेसचा आहे. देशाचे संविधान आणि स्वातंत्र्य वाचू शकेल, हा लोकांचा विश्वास आहे. 14 ऑगस्ट 1946 मध्ये रक्तपात होऊन देशाची फाळणी झाली. हा दिवस स्मृती दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. यातूनच एक घातक विचार देशासमोर येत आहे. कारण रक्तपात होणारा दिवस हा स्मृती दिवस होऊ शकत नाही, असेही नाना पटोले म्हणाले. यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत हिंदू-मुस्लीम वाद करून या देशाचे तुकडे करून निवडणूक जिंकता येते का, हा प्रयत्न सुरू झाला तर नाही ना, अशी शंका नाना पटोले यांनी व्यक्त केली.

काँग्रेसच्या व्यर्थ ना जाये बलिदान कार्यक्रमामध्ये स्वतंत्र्य संग्राम लढ्यातील सहभागी नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.

हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या कंपन्यांना दिले कंत्राट, नवनीत राणांचा यशोमती ठाकुरांवर पलटवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.