नागपूर - देशात भाजप सरकार तानाशाही पद्धतीने वागत आहे. ईडीची कारवाई करत नेत्यांना घाबरवण्याचा तसेच शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गांधी कुटुंबावर होत असलेल्या ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
मागील काही दिवसांत ईडीकडून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आता काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची चौकशी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या प्रमाात आंदोलन करण्यात येत आहे.
काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांनी ईडी कार्यालयाबाहे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी येथे हस्तक्षेप केला. दरम्यान, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा - शाळेत साहेब आल्याचे कळताच वेगात निघालेल्या 'त्या' शिक्षिकांच्या गाडीला अपघात तीघी जखमी