ETV Bharat / city

Sonia Gandhi ED Inquiry : सोनिया गांधींच्या ईडी चौकशीला विरोध; नागपुरात ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ - ईडी चौकशी सोनिया गांधी

ईडीने आज ( गुरुवारी ) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ( Inquiry of Congress President Sonia Gandhi by ED ) यांची चौकशी सुरू केली आहे. या विरोधात आज देशभरात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नागपूर ईडी कार्यालयासमोर ( Nagpur ED Office Congress Agitation ) सुद्धा काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचे ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

काँग्रेस नागपूर आंदोलन
काँग्रेस नागपूर आंदोलन
author img

By

Published : Jul 21, 2022, 3:01 PM IST

Updated : Jul 21, 2022, 3:33 PM IST

नागपूर - नॅशनल हेराल्ड प्रकरणात ( अंमलबजावणी संचालनालय ) ईडीने आज ( गुरुवारी ) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ( Inquiry of Congress President Sonia Gandhi by ED ) यांची चौकशी सुरू केली आहे. या विरोधात आज देशभरात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नागपूर ईडी कार्यालयासमोर ( Nagpur ED Office Congress Agitation ) सुद्धा काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचे ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. मध्यंतरी काँग्रेस कार्याध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत बरी नसल्याने त्या चौकशीसाठी हजर राहू शकल्या नव्हत्या. अखेर आज त्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे. या आधी राहुल गांधी यांची सुद्धा या प्रकरणी अनेक वेळा चौकशी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ईडीच्या माध्यमातून गांधी कुटुंबाला टार्गेट करत असल्याचा आरोप करत जोरदार निदर्शने केली आहेत.

ईडी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करताना काँग्रेसचे कार्यकर्ते

पोलिसांचा तगडा बंदोबस्त : राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली, तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथील ईडी कार्यालया बाहेर जोरदार राडा केला होता. कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयात घुसण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यामुळे यावेळी पोलिसांनी संपूर्ण परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण? : नॅशनल हेराल्ड प्रकरण (2012)मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यंग इंडियन लिमिटेड (YIL) मार्फत विकत घेतले. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसच्या (2000)कोटी रुपयांच्या इमारतीवर कब्जा करण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता. कटाच्या अंतर्गत यंग इंडियन लिमिटेडला TJL च्या मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे.

हेही वाचा - National Herald Case: सोनिया गांधी 'ईडी' कार्यालयात दाखल, प्रियांका गांधीही सोबत, देशात ठिकठिकाणी आंदोलन

Last Updated : Jul 21, 2022, 3:33 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.