नागपूर - उपराजधानी नागपुरातील वर्ग पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने ( School closed dates 31st Jan in Nagpur ) घेतला आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नागपुरातही प्रशासनाने नवे नियम लागू केले ( New covid rules in Nagpur ) आहे. उद्यापासून पहिली ते आठवी या वर्गाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी माहिती दिली आहे.
नागपुरातील रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणांची ( Health department preparation before third wave ) तयारी पूर्ण झाली आहे. ऑक्सिजनची व्यवस्था ही पुरेशी आहे. बेड्स पुरेश्या संख्येने उपलब्ध असल्याचेही पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, की ओमायक्रॉन धोकादायक नाही, असे लोकांना वाटत आहे. असे असले तरी डेल्टा अजूनही आहे. हे विसरू नये. पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज नागपूर शहरातील विविध शासकीय रुग्णालयात जाऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासनाची एक बैठक घेतली. यावेळी पहिली ते आठवी वर्गापर्यंतची शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ( Nagpur School closing dates ) घेण्यात आला.
हेही वाचा-Maharashtra Colleges Closed : मोठा निर्णय.. राज्यभरातील कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद
कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार-
उद्यापासून सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे. या चाचणीत जे कर्मचारी पॉझिटिव्ह आढळतील त्यांना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवले जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा-Narendra Modi In Punjab : तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा, मी भटिंडा विमानतळावर जिवंत आलो... मोदींनी अधिकाऱ्यांना सांगितले
रॅपिड चाचणीवर भर-
नागपुरातील मोठ्या बाजारात येणाऱ्यांच्या रॅपिड कोरोना चाचणी केल्या जातील अशी माहितीही पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिली आहे. शहरातील मॉल, मंगल कार्यालय तसेच थिएटर्समध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. अन्यथा त्यांच्याविरोधात कठोर आर्थिक दंड लावले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यभरातील कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याची राज्य सरकारची घोषणा-
आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले ( Covid Spread In Maharashtra ) आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला ( Schools Closed Maharashtra ) आहे. आता अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, स्वयं अर्थ सहाय्यक विद्यापीठ, तंत्रनिकेतन विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांचे वर्ग येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात ( Maharashtra College Closed ) आल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( Higher Technical Education Minister Uday Samant ) यांनी केली. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सामंत यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.