ETV Bharat / city

Nitin Gadkari : राज्याच्या राजकारणावर बोलण्यास केंद्रीय मंत्री गडकरींची चुप्पी - नितीन गडकरी महाराष्ट्र राजकारण

शहरातील ऐतिहासिक प्रसिद्ध फुटाळा तलावाच्या अगदी मधोमध जगातील सर्वात मोठा आणि उंच कारंजे (फाउंटन)चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याची पाहणी गडकरी यांनी केली आहे. तेव्हा त्यांनी राज्याच्या राजकारणावर बोलण्यास नकार दिला ( nitin gadkari no comment on maharashtra political crisis ) आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari
author img

By

Published : Jul 1, 2022, 9:39 PM IST

नागपूर - नागपूर शहराच्या वैभवात आणखी भर पडली पडणार आहे. शहरातील ऐतिहासिक प्रसिद्ध फुटाळा तलावाच्या अगदी मधोमध जगातील सर्वात मोठा आणि उंच कारंजे (फाउंटन)चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होतं असलेला या प्रकल्पाने आता आकार घेतला आहे. येत्या काळात फुटाळा म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शोचे उद्घाटन होणार असून, त्या आधी गडकरी यांनी प्रकल्पाची पाहणी केली आहे.

फुटाळा म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शो हा प्रोजेक्ट नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. नागपूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या फुटाळा म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शो प्रकल्पाच्या उद्घाटनापूर्वी नितीन गडकरी यांनी आज ( 1 जुलै ) अधिकाऱ्यांसह या प्रकल्पाची पाहणी केली आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी फुटाळा म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शोचे उद्घाटन होणार आहे.

जगातील सर्वात मोठे फाउंटन - दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या तसेच गुलजा, अमिताभ बच्चनसह नाना पाटेकर यांची कॉमेंट्री ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पामुळे नागपुरच्या पर्यटनात भर पडेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. जगातील सर्वात मोठे फाउंटन पाहण्यासाठी एकाचवेळी 4 हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी मोठी गॅलरी तयार करण्यात आली आहे. शहरात वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट साकारून शहराचा सौंदर्य वाढविण्याचा प्रयत्न नितीन गडकरी यांच्या मार्फत केला जात आहे.

माझ्याकडे निधीची कमतरता नाही - शहरात नाविन्यपूर्ण कामे सुरू आहेत. यासाठी कितीही निधी लागला तरी तो केंद्र सरकार कडून दिला जाईल. राज्यात कुठलेही सरकार आले तरी माझ्या कामांमध्ये पैशाची अडचण येत नाही. तसेच, यावेळी राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर कोणतेही व्यक्तव्य करण्यास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नकार दिला ( nitin gadkari no comment on maharashtra political crisis ) आहे.

हेही वाचा - Aarey Car Shed : मुख्यमंत्री शिंदेंच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मेट्रोचे कारशेड आरेमध्ये बनवण्याचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.