नागपूर - आज सकाळी सीबीआयचे एक पथक दाखल त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी दाखल झाले आहे. ज्यामध्ये सहा अधिकारी असून एक महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे. मात्र, विविध यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई सुरू झाल्यापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय अज्ञातवासात गेले आहेत. त्यामुळे आता सीबीआयच्या पथकाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान सीबीआयचे एक पथक दाखल झाले. काही दिवसांपूर्वी देखील आयकर विभागाने देखील छापे टाकून कागदपत्रांची पडताळणी केली होती. त्याआधी ईडीने सुद्धा देशमुख यांच्या नागपूर, काटोल आणि मुंबई येथील निवासस्थानी धाडी टाकल्या होत्या. देशमुख यांच्या निवासस्थानी कुटुंबातील कुणीही नाही. गेल्या काही महिन्यांपासून अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय अज्ञातवासात गेले आहेत. त्यांचा कुणाशी संपर्क नसल्याने आता सीबीआयचं पथक जेव्हा त्यांच्या घरी दाखल झालेलं आहे. त्यावेळी घरात मात्र कुटुंबातील कुणीही उपस्थित नसल्याचं पुढे आले आहे.
मनी लॉण्ड्रिंगचा आरोपही देशमुख यांच्यावर आहे. यापूर्वी ईडी व सीबीआयनं अनेकदा देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरी छापे टाकले होते. देशमुख यांना चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं होतं. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
यापूर्वीही अनिल देशमुखांच्या घरी ईडीचा छापा -
मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अंटिलिया कार स्फोटक प्रकरण या दोन्ही प्रकरणात मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल झाले. अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. बदलीच्या नाराजीमुळे परमबीर सिंग यांनी एक पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. या पत्रात त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार, पब आणि रेस्टॉरंटमधून शंभर कोटी रुपये महिन्याला वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचे लिहिले होते. या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तेंव्हापासून अनिल देशमुख हे ईडीच्या रडावर आहे. दरम्यान, यापूर्वीही ईडीने अनिल देशमुखांच्या घरी छापा टाकला होता.
देशमुखांविरोधात लूकआऊट नोटीसही
अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्याआधारे सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासान्वये 'ईडी'नेसुद्धा पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू केला आहे. त्याअंतर्गत 'ईडी'ने आत्तापर्यंत पाच वेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता सहावे समन्सदेखील बजावण्याची तयारी 'ईडी'ने केली आहे, पण त्याआधी त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी सप्टेंबरमध्ये लूकआऊट नोटीस बजावण्यात आली होती.
हेही वाचा - LIVE UPDATE : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक, वाचा सर्व अपडेट एका क्लिकवर