नागपूर - पेंच नदीवरील सालई येथील पूलाचा भाग पाण्याच्या जोरामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील चौराई धरणातून पेंच धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यानंतर पेंच नदीला पूर आला होता. आज सकाळी या पुरामुळे पारशिवनी तालुक्यातील सालई येथील पेंच नदीवर दोन वर्षांआधी तयार करण्यात आलेला पूलचा भाग वाहून गेला आहे.
त्यामुळे परिसरातून मनसर, रामटेकला जाणाऱ्यांसाठी वाहतुकीचा प्रश्न उभा राहिलाय. यामुळे नदी पलिकडील भागातील संपर्क तुटलाय. विशेष म्हणजे हा पूल दोन वर्षांपूर्वीच बांधण्यात आला होता.
२०१४ साली या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. साधारणतः अडीच वर्षांपूर्वी हा पूल रहदारीसाठी खुला करण्यात आला होता. १२ कोटी ४१ लक्ष रुपये खर्च पुलाच्या बांधणीसाठी लागला होता. मात्र काल आलेल्या पुरामुळे या पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. रामटेके विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांनी पुलाचे निरीक्षण करून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.